प्रिती झिंटाला इतक्या कोटींची कर्जमाफी, मोठी माहिती समोर
Bollywood Actress Preity Zinta: 18 कोटी रुपयांचं कर्ज मंजूर झाल्यानंतर प्रिती झिंटाला इतक्या कोटींची कर्ज माफी... याप्रकरणी मोठी माहिती समोर... प्रिती कायम काणत्या न कोणत्या कारणामुळे असते चर्चेत...

अभिनेत्री प्रिती झिंटा आता पूर्वीप्रमाणे बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील 18 कोटींच्या कर्ज प्रकरणामुळे चर्चेत आली आहे. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेकडून अभिनेत्री प्रीती जिंटाला 1.5 कोटी कर्ज माफी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. लाच घेऊन विविध लोकांना 400 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज मंजूर केल्याच्या आरोपाखाली न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेचे माजी अध्यक्ष हिरेन भानू यांच्याविरुद्ध प्राथमिक चौकशी सुरू असल्याची देखील माहिती मिळत आहे.
तपास करत असलेल्या आर्थिक गुन्हे शाखेला अभिनेत्री प्रिती झिंटाच्या बँकेसोबतच्या व्यवहारांची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी सांगितले की, 7 जानेवारी 2011 रोजी झिंटाला 18 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले. मात्र 31 मार्च 2013 रोजी हे कर्ज एनपीए म्हणून घोषित करण्यात आले.
View this post on Instagram
कर्जाची रक्कम 10.74 कोटी रुपयांमध्ये निश्चित करण्यात आली आणि 1.55 कोटी रुपयांची कर्ज माफी तिला देण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे. 5 एप्रिल 2014 रोजी ही रक्कम भरण्यात आली , असं एका अधिकाऱ्याने सांगितलं.
फेब्रुवारीमध्ये, केरळच्या काँग्रेस युनिटने आरोप केला होता की, भाजपला पाठिंबा दिल्याच्या बदल्यात बँकेने 18 कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. मात्र उत्तरात, झिंटा हिने स्पष्ट केले की, बँकेकडे 12 वर्षांपूर्वी बँकेत ओव्हरड्राफ्ट सुविधा होती, जी एका दशकापूर्वी पूर्णपणे परतफेड करण्यात आली होती.
बँकेच्या आर्थिक अडचणींमुळे त्यांना फायदा झाला या दाव्याला नकार देत, तिने सांगितले की तेव्हापासून तिचे खाते बंद करण्यात आले आहे. एका आर्थिक दंडाधिकाऱ्याने सांगितले की त्यांच्याकडे बँकेकडून कागदपत्रे आहेत आणि ते त्याचा अभ्यास करत आहेत.
प्रिती झिंटा हिचे सिनेमे
प्रिती झिंटा हिने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्री बॉलिवूडपासून दूर आहे. पण आता अभिनेत्री लवकरच नव्या सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. ‘लाहोर 1947’ सिनेमात प्रिती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सिनेमात प्रिती हिच्यासोबत अभिनेते सनी देओल देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.