प्रियांका चोप्रा-निक जोनासचे खासगी फोटो लीक; 10 वर्षांनी लहान पतीसोबत ‘देसी गर्ल’चा रोमँटिक अंदाज

बॉलिवूडची देसी गर्ल अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्राने पती निक जोनास आणि आई मधू चोप्रा यांच्यासोबत मेक्सिकोमध्ये नवीन वर्षांचं स्वागत केलं. या व्हेकेशनचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यापैकी काही फोटोंमध्ये प्रियांका आणि निक यांचे खासगी क्षण कैद झाले आहेत.

प्रियांका चोप्रा-निक जोनासचे खासगी फोटो लीक; 10 वर्षांनी लहान पतीसोबत 'देसी गर्ल'चा रोमँटिक अंदाज
Priyanka Chopra and Nick JonasImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 03, 2024 | 12:53 PM

मुंबई : 3 जानेवारी 2024 | बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंतचा यशस्वी प्रवास करणारी ‘देसी गर्ल’ अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्रा आता परदेशात पतीसोबत राहते. मात्र भारतात ती नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतेच. शूटिंगनिमित्त किंवा कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी प्रियांका भारतातसुद्धा येते. नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. न्यू इअर व्हेकेशनचे हे तिचे फोटो असून त्यात ती पती निक जोनाससोबत रोमँटिक अंदाजात दिसून येतेय. प्रियांका आणि निकचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. प्रियांका आणि निक व्हेकेशनवर गेल्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी त्यांनी सुट्ट्यांचा आनंद घेतानाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. मात्र यावेळी प्रियांका किंवा निकने हे फोटो पोस्ट केले नाहीत. तर दुसऱ्यांनी त्यांचे खासगी फोटो क्लिक केले आणि ते लीक केले आहेत.

प्रियांका पती निकसोबत काबो याठिकाणी सुट्ट्यांचा आनंद घेत असल्याचं या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय. या फोटोंमध्ये निक आणि प्रियांकाचे खासगी क्षण पहायला मिळत आहेत. पूलजवळ प्रियांका स्विमसूटमध्ये उभी असून निकसोबत ती रोमँटिक होताना दिसतेय. प्रियांकाने पांढऱ्या रंगाची मोनॉकिनी आणि त्यावर ऑरेंज श्रग घेतला आहे. तर शॉर्ट्स आणि टी-शर्ट असा निकला कॅज्युअल लूक आहे. हे दोघं एकमेकांच्या मिठीत किस करताना हा फोटो काढण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

पहा फोटो

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी 2024 या नवीन वर्षाची सुरुवात मेक्सिकोमधील काबो याठिकाणी केली. या सेलिब्रेशनमध्ये प्रियांकाची आई मधू चोप्रासुद्धा सहभागी झाल्या होत्या. न्यू इअर सेलिब्रेशनचे फोटो प्रियांकाने शेअर केले नाहीत. पण तिच्या फॅन अकाऊंटवरून बरेच फोटो व्हायरल झाले आहेत. या अकाऊंटवर प्रियांकाचे तिच्या मुलीसोबतचे काही फोटोसुद्धा पोस्ट करण्यात आले आहेत. प्रियांकाच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास, ती ‘हेड्स ऑफ स्टेट’ या चित्रपटात जॉन सिना आणि इद्रिस एल्बासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.