Priyanka Chopra | हिंदू धर्माबद्दल ‘देसी गर्ल’च्या पतीची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला निक जोनस?

'मी एका अशा महिलेसोबत लग्न केलंय जी हिंदू आहे, आणि माझ्या मुलीला मी...', प्रियांका चोप्राचा पती निक जोनस त्याच्या वक्तव्यामुळे तुफान चर्चेत...

Priyanka Chopra | हिंदू धर्माबद्दल 'देसी गर्ल'च्या पतीची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला निक जोनस?
Follow us
| Updated on: May 23, 2023 | 1:23 PM

मुंबई : ‘बाजीराव मस्तानी’, ‘स्काय इज पिंक’, ‘दिल धडकने दो’, ‘बर्फी’, ‘डॉन २’, ‘अंजाना अंजानी’, ‘मेरा कॉम’ अशा अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) हिने चाहत्यांच्या मनात राज्य केलं. प्रियांकाने फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, हॉलिवूडमध्ये देखील स्वतःची एक वेगळी ओळख तयार केली. जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणून देखील प्रियांका चोप्रा हिची ओळख आहे. इंडस्ट्रीमधील तिच्या योगदानाबद्दल प्रियांका कायम चर्चेत असते.. पण अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील कामय चर्चेत असते.. अमेरिकन गायक निक जोनस याच्यासोबत लग्न केल्यानंतर देखील प्रियांकाबद्दल रंगणाऱ्या चर्चांनी जोर धरला.. प्रियांका आणि निक यांचं लग्न हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीत झालं.. आता लग्नाच्या अनेक वर्षांनंतर निक जोनस याने हिंदू धर्माबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे..

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत निक म्हणाला, ‘देवासोबत असलेलं माझं नातं खास आहे… पण आता देवाने अनेक रुप धारण केले आहेत… मी एका अशा महिलेसोबत लग्न केलंय जी हिंदू आहे. ज्यामुळे मला असंख्य गोष्टी शिकता आल्या आणि त्या प्रचंड प्रेरणादायी आहेत..’ असं निक म्हणाला…

हे सुद्धा वाचा

एवढंच नाही तर, मुलगी मालती मेरी हिच्याबद्दल देखील निक म्हणाला, ‘आम्ही मालतीवर असे संस्कार करतो, ज्यामुळे तिला हिंदू आणि ख्रिश्चन दोन्ही धर्मांची शिकवण मिळेल… मालतीमध्ये बायबल आणि हिंदू धर्मातील तत्वे असतील…’ सध्या सर्वत्र प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांची चर्चा रंगत आहे..

View this post on Instagram

A post shared by Nick Jonas (@nickjonas)

निक आणि मालती यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २०१८ साली मोठ्या थाटात निक जोनस आणि प्रियांका चोप्रा यांनी लग्न केलं.. दोघांचं लग्न राजस्थानमधील उम्मेद भवन पॅलेसमध्ये झालं होतं. दोघांच्या लग्नात जवळच्या मित्रांव्यतिरिक्त अनेक सेलिब्रिटी देखील उपस्थित होते. जानेवारी २०२२  मध्ये निक आणि प्रियांका सरोगसीद्वारे मुलीला जन्म दिला..

प्रियांका चोप्रा आणि निक जोनस कायम सोशल मीडियावर सक्रिय असतात. प्रियांका कायम तिच्या मुलीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.. सोशल मीडियावर प्रियांका हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते… प्रियांका हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री सध्या ‘सिटाडेल’ वेब सीरिजमुळे चर्चेत आहे..

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.