AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Parineeti – Raghav यांच्या साखरपुड्यानंतर प्रियांकाची पोस्ट चर्चेत; अभिनेत्री म्हणाली, ‘आता आम्हाला…’

प्रियांका चोप्राला ज्या क्षणाची प्रतीक्षा आहे, त्या प्रतीक्षेत चाहते देखील... बहिणीच्या साखरपुड्यानंतर अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने केलेली पोस्ट चर्चेत... असं काय म्हणाली 'देसी गर्ल' ?

Parineeti - Raghav यांच्या साखरपुड्यानंतर प्रियांकाची पोस्ट चर्चेत; अभिनेत्री म्हणाली, 'आता आम्हाला...'
| Updated on: May 14, 2023 | 11:05 AM
Share

मुंबई : बॉलिवूड आणि राजकीय वर्तुळात सध्या अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आप पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. सध्या सर्वत्र परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याच्या फोटो आणि व्हिडीओची चर्चा रंगत आहे. खुद्द परिणीती आणि राघव यांनी साखरपुड्याचे फोटो पोस्ट करत चाहत्यांसोबत आनंद शेअर केला आहे. दोघांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट केल्यानंतर चाहते आणि अनेक सेलिब्रिटींनी दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला. दरम्यान अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने देखील बहिणीला नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. प्रियांका हिने साखरपुड्याचे काही फोटो शेअर करत परिणीती आणि राघव यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

परिणीती आणि राघव यांचा फोटो शेअर करत अभिनेत्री म्हणाली, ‘अभिनंदन तिशा आणि राघव… आता आम्ही लग्नाची वाट पाहतोय! तुम्हा दोघांसाठी आणि कुटुंबासाठी मी खूप आनंदी आहे.’ पोस्टमध्ये प्रियांकाने परिणीती हिचा तिशा म्हणून उल्लेख केला आहे. तर एक फोटो प्रियांकाने कुटुंबासोबत देखील शेअर केला आहे शिवाय परिणीती आणि राघव प्रार्थना करत असल्याचा फोटो देखील देसी गर्लने शेअर केला.

View this post on Instagram

A post shared by Priyanka (@priyankachopra)

परिणीती आणि राघव यांच्या साखरपुड्यानंतर प्रियांका बहिणीच्या लग्नाच्या प्रतीक्षेत आहे. फक्त प्रियांकाच नाही तर परिणीती हिचे चाहते अभिनेत्रीच्या लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत. परिणीतीच्या साखरपुड्यासाठी सर्वात आधी अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने हजेरी लावली.

प्रियांका चोप्रा हिच्यानंतर परिणीतीचे कुटुंबीय येऊ लागले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हेही साखरपुडा सोहळ्यात सहभागी झाले होते. याशिवाय देशाचे माजी गृहमंत्री पी. चिदंबरम, काँग्रेस नेते कपिल सिब्बल, शिवनेता नेते आदित्य ठाकरे आणि टीएमसी खासदार डेरेक ओब्रायन हे देखील दोघांच्या साखरपुड्यासाठी पोहोचले.

परिणीतीला हॉटेलबाहेर खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत स्पॉट केल्यानंतर दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगू लागल्या. दरम्यान, आम आदमी पक्षाचे खासदार संजीव आरोरा यांनी ट्विट करत दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. (Parineeti Chopra Raghav Chadha Wedding) परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा आता लग्न कधी करणार या प्रतीक्षेत चाहते आहेत.

नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं.
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!.
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?.
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.