AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Priyanka Chopra ने विकली मुंबईतील संपत्ती, आता ‘हे’ कपल असेल मालक

प्रियांका चोप्रा हिने कोणासाठी विकली मुंबईतील संपत्ती? प्रॉपर्टी विकल्यानंतर अभिनेत्रीला मिळाले इतके कोटी... सध्या सर्वत्र 'देसी गर्ल' आणि तिच्या मुंबईतील संपत्तीची चर्चा...

Priyanka Chopra ने विकली मुंबईतील संपत्ती, आता 'हे' कपल असेल मालक
| Updated on: Apr 19, 2023 | 10:18 AM
Share

मुंबई : अभिनेत्री प्रियंका चोप्रा कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री एका मोठ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. लग्नानंतर पती निक जोनस आणि मुलगी मालती मेरी हिच्यासोबत अमेरिकेत राहणाऱ्या प्रियंकाने तिची मुंबईतील संपत्ती विकली आहे. मुंबईतील संपत्ती विकल्यामुळे अभिनेत्रीला कोट्यवधी रुपयांचा फायदा झाला आहे. प्रियांकाने मुंबईतील लोखंडवाला याठिकाणी असलेली तिची कमर्शियल प्रॉपर्टी विकली आहे. मुंबईतील प्रॉपर्टी विकल्यामुळे अभिनेत्री तुफान चर्चेत आली आहे. मुंबईतील प्रॉपर्टी विकल्यानंतर अभिनेत्रीला किती कोटी रुपयांचा फायदा झाला? अशी चर्चा सध्या चाहत्यांमध्ये रंगत आहे.

प्रियांका हिची प्रॉपर्टी लोखंडवाला रोडवर असलेल्या  Vastu Precinct च्या दुसऱ्या मजल्यावर आहे. ही एका ऑफिसची जागा आहे. या जागेचा कार्पेट एरिया १७८१.१९ स्क्वयर फिट आहे. तर टॅरेस एरिया ४६५ स्क्वयर फिट आहे. प्रियांकाने मुंबईतील ही संपत्ती आई मधु चोप्रा यांच्यासाठी विकली आहे. अभिनेत्रीची प्रॉपर्टी एका डेन्टीस्ट कपलने घेतली आहे.

ज्या डेन्टीस्ट कपलने प्रियांकाची प्रॉपर्टी खरेदी केली आहे, त्यांचं नाव नितेश आणि निकिता मोटवाणी असं आहे. २०२१ मध्ये या कपलने अभिनेत्रीची प्रॉपर्टी भाडे तत्त्वावर घेतली होती. भव्य ऑफिसच्या जागेमध्ये एक ओपन कार पार्किंग स्पेस देखील आहे. ही प्रॉपर्टी विकल्यानंतर प्रियांका हिला ७ कोटी रुपयांचा फायदा झाला आहे.

प्रियांका हिच्या प्रॉपर्टीबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीची देश – विदेशात कोट्यवधी रुपयांची प्रॉपर्टी आहे. अभिनेत्री सध्या अमेरिकेत पती निक जोनस आणि मुलगी मालती मेरी हिच्यासोबत आयुष्य जगत आहे. शिवाय अभिनेत्री आगामी ‘सिटाडेल’ सीरिजमुळे देखील तुफान चर्चेत आली आहे. सध्या प्रियांका ‘सिटाडेल’ सीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

‘सिटाडेल’ सीरिजशिवाय अभिनेत्री ‘जी ले जरा’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमात प्रियांका, अभिनेत्री कतरिना कैफ आणि आलिया भट्ट यांच्यासोबत एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्री तिच्या आगामी प्रोजेक्टमुळे चर्चेत आहे. मध्यंतरी अभिनेत्री बॉलिवूडबद्दल मोठं वक्तव्य केलं. ज्यामुळे अभिनेत्री चर्चेत आली होती.

बॉलिवूडबद्दल काय म्हणाली प्रियांका चोप्रा?

प्रियांका म्हणाली, ‘इंडस्ट्रीने मला एका बाजूला करुन दिलं. लोक मला सिनेमांमध्ये ऑफर करत नव्हते. मला काही खेळ खेळता येत नाहीत. बॉलिवूडमधील राजकारण मला जमलं नाही. म्हणून मी थकली होती. त्यानंतर मला ब्रेक हवा आहे असं मी म्हणाली….’ बॉलिवूडबद्दल प्रियांकाने केलेलं वक्तव्य सध्या तुफान चर्चेत आहे.

दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.