अनन्या पांडे हिने चक्क प्रियांका चोप्रा हिच्या पतीला मारला धक्का, निक जोनस याचा चढला पारा, ‘तो’ हैराण करणारा व्हिडीओ…
Video : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. बॉलिवूड कलाकार या लग्नात धमाल करताना दिसले. हेच नाहीतर विदेशातून प्रियांका चोप्रा ही पती निक जोनस याच्यसोबत लग्नात पोहोचली होती.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न 12 जुलै 2024 रोजी मुंबईमध्ये पार पडले. या लग्नासाठी अनेक लोक भारतामध्ये दाखल झाले. गेल्या काही महिन्यांपासून या लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. विशेष म्हणजे प्री वेडिंग फंक्शनच धमाकेदार पद्धतीने करण्यात आले. अनंत आणि राधिकाच्या मेंहदी आणि हळदीचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. बॉलिवूडच्या कलाकारांनी या लग्नात चांगलाच धमाका केल्याचे व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओनंतर दिसत आहे. सर्वजण स्टेजवर डान्स करताना दिसले. जवळपास सर्वच बॉलिवूड कलाकार या लग्नासाठी पोहोचले होते.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नासाठी प्रियांका चोप्रा ही पती निक जोनस याच्यासोबत भारतामध्ये पोहोचली. लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. प्रियांका चोप्रा, निक जोनस आणि अनन्या पांडे यांचा अनंत अंबानी याच्या लग्नातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून लोक हैराण झाले.
लग्नातील व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, प्रियांका चोप्रा ही मस्त डान्स करत आहे. पत्नी प्रियांकाच्या शेजारीचडान्स करत आहे. मात्र, मागे डान्स करत असलेली अनन्या पांडे ही चक्क निक जोनस याच्याकडे पाहून जोरात धक्का मारते आणि पुढे येऊन प्रियांका चोप्राच्या शेजारी डान्स करते. नेमके काय सुरू आहे हेच निक जोनस याला कळत नाही.
View this post on Instagram
मागे निक जोनस जातो आणि तो फक्त अनन्या पांडे हिच्याकडे पाहत राहतो. निक जोनस याला हा प्रकार अजिबातच आवडल्याचे दिसत नाही, तो शांत होतो. मात्र, यावेळी प्रियांका चोप्रा हिचे अजिबात लक्ष नाही आणि काय घडले हे देखील प्रियांका चोप्राला कळत नाही. मात्र, निक जोनस हा चांगलाच रागात असल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे.
हा सर्वप्रकार रणवीर सिंहच्या लक्षात येतो आणि तो अजिबात वेळ न घालता निक जोनस याचा हात पकडतो आणि त्याला पुढे आपल्यासोबत डान्स करण्यास घेतो आणि यानंतर निक जोनस थोडा शांत होताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोक अनन्या पांडे हिच्यावर जोरदार टीका करताना दिसत आहेत. एकाने म्हटले की, प्रियांका चोप्राला घडलेला प्रकार काहीच महिती नाहीये. ही अनन्या अशाप्रकारे का धक्का मारत आहे?