पुलकित सम्राट कायम सोबत ठेवतो सॅनिटरी पॅड, कारण जाणून म्हणाल…

Pulkit Samrat | पुलकित सम्राट कायम सोबत का ठेवतो सॅनिटरी पॅड? कारण जाणून म्हणाल..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्याच्या एक सवयीची चर्चा... गेल्या काही दिवसांपासून पुलकित त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे... अभिनेत्याने नुकताच अभिनेत्री कृती खरबंदा हिच्यासोबत लग्न केलं आहे...

पुलकित सम्राट कायम सोबत ठेवतो सॅनिटरी पॅड, कारण जाणून म्हणाल...
Follow us
| Updated on: Mar 23, 2024 | 3:18 PM

अभिनेता पुलकित सम्राट गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चा रंगत आहे. अनेक वर्ष अभिनेत्री कृती खरबंदा हिला डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. नुकताच, मोठ्या थाटात पुलकित आणि कृती यांनी लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. दरम्यान, कृती हिचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्री पुलकित याचा कौतुक करताना दिसत आहे. कृतीने सांगितले होते की, पुलकित कायम सॅनिटरी पॅड आणि टॅम्पन्स स्वतःच्या बॅगेत ठेवतो. तिच्या मासिक पाळीत पुलकित तिला कशी मदत करायचा हे देखील अभिनेत्रीने मुलाखतीत सांगितंलं होतं.

एका मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली होती, ‘पुलकित कायम त्याच्या बॅगेत सॅनिटरी पॅड आणि टॅम्पन्स ठेवतो. जेव्हा माझी मासिक पाळी सुरु असते तेव्हा पुलकित माझी खूप काळजी घेतो. मी त्याची गर्लफ्रेंड आहे, तो मला डेट करत आहे म्हणून तो फक्त माझी तर पुलकित त्याच्या बहिणींची, मैत्रिणींची सर्वांची काळजी घेतो..’ असं देखील अभिनेत्री म्हणाली… सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त पुलकित आणि कृती यांची चर्चा रंगली आहे.

पुलकित सम्राट याचं पहिलं लग्न

पुलकित सम्राट याचं पहिलं लग्न सलमान खान याची मानलेली बहीण श्वेता रोहिरा हिच्यासोबत झालं होतं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 2014 मध्ये पुलकित आणि श्वेता यांनी लग्न केलं होतं. त्यानंतर 2015 मध्ये दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. फक्त एक वर्ष दोघांचं लग्न टिकलं. खुद्द सलमान खान याने श्वेताच्या लग्नाची तयारी केली होती.

हे सुद्धा वाचा

पुलकित सम्राट याच्याबद्दल सांगायचं झालं तर, पुलकित बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. ‘फुकरे’, ‘पागलपंती’, ‘समन रे’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये पुलकित याने महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. सोशल मीडियावर देखील अभिनेता कायम सक्रिय असतो. कृती हिच्यासोबत लग्न झाल्यानंतर देखील अभिनेत्याने खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. चाहत्यांनी देखील अभिनेत्याच्या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव केला.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.