अमाप संपत्तीची मालकीण ‘ही’ पंजाबी अभिनेत्री; तिच्या श्रीमंती पुढे बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री फेल

१० हजार रुपयांपासून 'या' पंजाबी अभिनेत्रीने केली करियरची सुरुवात, आज 'अशा'प्रकारे कोट्यवधींची माया, अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत होते तिची तुलना...सध्या सर्वत्र अभिनेत्री आणि तिच्या संपत्तीची रंगतेय चर्चा... कोण आहे 'ही' अभिनेत्री?

अमाप संपत्तीची मालकीण 'ही' पंजाबी अभिनेत्री; तिच्या श्रीमंती पुढे बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री फेल
Follow us
| Updated on: Nov 01, 2023 | 2:11 PM

मुंबई : 1 नोव्हेंबर 2023 : झगमगत्या विश्वातील सेलिब्रिटी कायम त्यांच्या रॉयल आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. आता देखील झगमगत्या विश्वातील एक अभिनेत्री तिच्या श्रीमंतीमुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र फक्त तिचीच चर्चा सुरु आहे. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे ती, पंजाबची असून अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारत तिने चाहत्यांचं मनोरंजन केलं. श्रीमंतीमध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोन – आलिया भट्ट यांना देखील टक्कर देणारी ही पजंबी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री सरगुन मेहता आहे. सरगुन सध्या तिच्या संपत्तीमुळे चर्चेत आली आहे.

सरगुन मेहता फक्त अभिनय विश्वात सक्रिय नसून अभिनेत्रीचं स्वतःचं प्रॉडक्शन हाऊस देखील आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, करियरच्या सुरुवातील विनोदवीर कपिल शर्मा याच्या ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये फक्त 10 हजार रुपयांवर अभिनेत्री काम करत होती. पण ‘उडारिया’ मालिकेच्या माध्यमातून सरगुन हिच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली.

2015 मध्ये पंजाबी सिनेविश्वात पाऊल ठेवणाऱ्या सरगुन हिने आता स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सरगुन स्टारर ‘काला शाह काला’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. अभिनेत्रीबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री अनेक मालिका आणि रिऍलिटी शोमध्ये देखील काम केलं आहे.

हे सुद्धा वाचा

निर्मिती म्हणून देखील सरगुन हिची ओळख

सरगुन फक्त मालिका किंवा शोची निर्मिती करत नसून, अभिनेत्रीने सिनेमांची देखील निर्मिती केली आहे. एवढंच नाही तर, सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील अभिनेत्री चांगलीच कमाई करते. सरगुन हिने तिच्या करियरची सुरुवात शुन्यापासून केली. म्हणून अभिनेत्रीची तुलना बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत करण्यात येते.

रिपोर्टनुसार, सरगुन एका सिनेमासाठी जवळपास 60 लाख रुपये मानधन घेते. तर अभिनेत्रीच्या एकूण संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री 50 कोटी रुपयांची मालकिण आहे. सध्या सर्वत्र सरगुन मेहता आणि तिच्या संपत्तीची चर्चा रंगत आहे…

सरगुन कामय तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियावर देखील कायम अभिनेत्रीचा कायम बोलबाला पाहायला मिळतो. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.