Pushpa 2 | ज्याठिकाणी झाल्या तब्बल 178 हत्या; त्याच खतरनाक जागेवर होणार ‘पुष्पा 2’ची शूटिंग
'पुष्पा 2' या चित्रपटाचं शूटिंग अत्यंत खतरनाक जागेवर पार पडणार असल्याचं कळतंय. ज्याठिकाणी 178 हत्या झाल्या, त्याच ठिकाणी या चित्रपटातील काही सीन्सचं शूटिंग होणार असल्याचं समजतंय.
मुंबई : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा : द रूल’ या सीक्वेलची सध्या जोरदार चर्चा आहे. अल्लू अर्जुनच्या वाढदिवशी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. त्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ‘पुष्पा : द राइज’ या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. पहिला भाग ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर आता दुसऱ्या भागात काहीतरी हटके दाखवण्याचा निर्मात्यांचा प्रयत्न आहे. यासाठी चित्रपटातील काही सीन्सचं शूटिंग खतरनाक लोकेशन्सवर करण्यात येणार आहे. ज्याठिकाणी जवळपास 178 हत्या झाल्या आहेत, त्या ठिकाणी ही शूटिंग होणार असल्याचं कळतंय.
प्रेक्षकांना एंटरटेन्मेंटचा पूर्ण डोस मिळावा यासाठी ‘पुष्पा : द रूल’चे निर्माते कोणतीच कसर सोडत नाहीयेत. ‘द हिंदू’ने दिलेल्या वृत्तानुसार प्रेक्षकांच्या वास्तवासारखा अनुभव देण्यासाठी प्रॉडक्शन मॅनेजर पी. व्यंकटेश्वर राव यांनी निर्णय घेतलाय की ओडिशाच्या मल्किन जिल्ह्यातील स्वाभिमान अंचलमध्ये शूटिंग केली जाईल. या परिसरात 2008 ते 2021 या कालावधीत माओवादी हिंसा पहायला मिळाली. या हिंसेत आजवर तब्बल 178 हत्या झाल्या आहेत. यात नागरिकांसोबतच सुरक्षा कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
या शूटिंगसाठी निर्मात्यांनी मलकानगिरी जिल्ह्याचे कलेक्टर आणि पोलीस अधिक्षकांची परवानगीसुद्धा घेतली आहे. या परिसरात ड्रोन कॅमेराने शूटिंग केली जाईल आणि जवळपास 200 लोक तिथे उपस्थित असतील. शूटिंगच्या वेळी कोणताही घातपात होऊ नये यासाठी सीमा सुरक्षा दलसुद्धा उपस्थित असतील. शूटिंगदरम्यान सुरक्षा व्यवस्थेची संपूर्ण काळजी घेतली जाईल. मे महिन्यात या ठिकाणी शूटिंगला सुरुवात होऊ शकते.
View this post on Instagram
पुष्पाचा पहिला भाग हिट झाल्यानंतर अल्लू अर्जुनने सीक्वेलसाठी दुप्पट फी आकारली आहे. ‘पुष्पा : द रूल’साठी त्याने तब्बल 85 कोटी रुपये स्वीकारल्याचं कळतंय. हा तेलुगू फिल्म इंडस्ट्रीतला एक नवीन रेकॉर्ड बनला आहे. दुसऱ्या भागाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे की पुष्पा तिरुपती तुरुंगातून फरार झाला आहे. त्याला आठ गोळ्या लागल्या आहेत. त्यामुळे तो जिवंत असण्याची शक्यता खूपच कमी आहे. ही बातमी समोर येताच पुष्पाचे समर्थक भडकले आहेत.
पुष्पाचे समर्थक विरोध प्रदर्शन करत त्याने केलेल्या चांगल्या कामाचे दाखले देऊ लागतात. त्याच्यामुळे कशाप्रकारे एका मुलाला जीवनदान मिळालं, तर दुसऱ्याला राहण्यासाठी घर मिळालं, असं ते सांगू लागतात. एकीकडे पुष्पाचे चाहते त्याच्या नावाने घोषणा देत असतात, तर दुसरीकडे पोलीस त्यांच्यावर लाठीमार आणि पाण्याचा वर्षाव करतात. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न असतो, तो म्हणजे ‘पुष्पा कुठे आहे?’
या ट्रेलरमध्ये पुढे दाखवण्यात आलं की एका वृत्तवाहिनीला क्लिप मिळते. ज्या जंगलात मोठ्या संख्येने वाघ असतात, तिथला हा व्हिडीओ असतो. यामध्ये पुष्पासारखी दिसणारी एक व्यक्ती पाठमोरी चालताना दिसते. जंगलाच्या अंधारात अखेरीस पुष्पाचा चेहरा समोर येतो. हा सीक्वेल कधी प्रदर्शित होणार याची अद्याप घोषणा करण्यात आली नाही. मात्र ‘पुष्पा 2’ या वर्षाच्या अखेरीस किंवा 2024 च्या सुरुवातीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं कळतंय.