‘प्यार का पंचनामा’ फेम अभिनेत्री गुपचूप अडकणार विवाहबंधनात! श्रीमंत उद्योजकासोबत ‘प्रेमसंबंध’

श्रीमंत उद्योजकासोबत 'प्यार का पंचनामा' फेम अभिनेत्री गुपचूप करणार लग्न! गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना करत आहेत डेट... सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याबद्दल चर्चा

'प्यार का पंचनामा' फेम अभिनेत्री गुपचूप अडकणार विवाहबंधनात! श्रीमंत उद्योजकासोबत 'प्रेमसंबंध'
Follow us
| Updated on: Jun 07, 2023 | 12:21 PM

मुंबई : ‘प्यार का पंचनामा’ सिनेमाने चाहत्यांचं भरभरुन मनोरंजन केलं. आज ही सिनेमाची चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेली असते. शिवाय सिनेमातील कलाकार देखील त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतात. आता ‘प्यार का पंचनामा’ सिनेमातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. अभिनेत्री गेल्या पाच वर्षांपासून डेट करत असलेल्या बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार आहे. ‘प्यार का पंचनामा’ सिनेमातील ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री सोनाली सहगल (Sonnaali Seygall ) आहे. अत्यंत साध्या पद्धतीत अभिनेत्री लग्न करणार आहे. सध्या सर्वत्र सोनाली सहगल हिच्या लग्नाची चर्चा आहे. सोनाली सहगल हिला ‘प्यार का पंचनामा’ सिनेमातून लोकप्रियता मिळाली होती.

रिपोर्टनुसार, सोनाली आज म्हणजे ७ जून रोजी बॉयफ्रेंड आशिष सजनानी याच्यासोबत लग्न करणार असल्याची माहिती समोर येत आहे. सोनाली आणि आशिष गेल्या पाच ते सहा वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. पण दोघांनी अद्यापही त्यांच्या नात्यावर मौन बाळगलं आहे. सध्या सर्वत्र सोनाली आणि आशिष यांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली लवकरच तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. महत्त्वाचं म्हणजे अभिनेत्रीचा होणार पती उद्योजक आहे. आशिष अनेक हॉटेल्सचा मालक आहे. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर आशिष आणि सोनाली यांनी नात्याला पती-पत्नीचं नाव देण्याचा निर्णय घेतला आहे.

हे सुद्धा वाचा

महत्त्वाचं म्हणजे, आशिष आणि सोनाली यांचं लग्न फार खास असणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी दोघे सप्तपदी घेणार आहेत. शिवाय, त्यांच्या प्री-वेडिंगच्या देखील तुफान चर्चा रंगत आहेत. ५ जून रोजी सोनालीचा मेहेंदीचा कार्यक्रम पार पडला.

रिपोर्ट्सनुसार, सोनाली लग्नानंतरही मीडियाशी बोलू इच्छित नाही किंवा तिला तिच्या नात्याबद्दल खुलासा करायचा नाही. रिपोर्ट्सनुसार, सोनालीला तिचं लग्न गुपित ठेवायचं आहे. अभिनेत्रीच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘दोघांना त्यांच्या नात्याचं सत्य गुपित ठेवायचं होतं. नात्याची चर्चा होईल… याच कारणामुळे दोघांनी नातं गुपित ठेवलं…’

सोनालीने २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘प्यार का पंचनामा’ मधून तिच्या बॉलिवूड करिअरची सुरुवात केली होती. हा सिनेमाचं दिग्दर्शन लव रंजन यांनी केलं होतं. यानंतर सोनाली ‘प्यार का पंचनामा २’ मध्येही दिसली होती. अभिनेत्रीने ‘वेडिंग पुलाव’मध्येही महत्त्वाची भूमिका साकारली होती. एवढंच नाही तर, सोनालीने अभिनेता सलमान खानसोबत थम्स अपच्या जाहिरातीतही दिसली होती.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.