3 Idiots साठी आर माधवन याने अशी दिली ऑडिशन; 13 वर्षांनंतर व्हायरल झालेल्या व्हिडीओची चर्चा

3 Idiots सिनेमाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं..., सिनेमासाठी आर माधवन याने दिलेल्या ऑडिशनचा व्हिडीओ तुफान व्हायरल; तुम्ही व्हिडीओ एकदा नक्कीच पाहाच...

3 Idiots साठी आर माधवन याने अशी दिली ऑडिशन; 13 वर्षांनंतर व्हायरल झालेल्या व्हिडीओची चर्चा
R MadhavanImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Feb 20, 2023 | 10:52 AM

R Madhavan audition in 3 Idiots : ‘३ इडियट्स’ (3 Idiots) सिनेमाने चाहत्यांच्या मनात घर केलं. २५ डिसेंबर २००९ साली प्रदर्शित झालेल्या ‘३ इडियट्स’ सिनेमाने जगण्याची एक नवी दिशा विद्यार्थ्यांना दाखवली. आजही सिनेमाची चर्चा रंगत असते. फक्त डिग्री मिळवण्यासाठी नाही तर, कायम काही तरी नवीन शिकता यावं म्हणून विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावा असं चित्र सिनेमातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिवाय खरी मैत्री काय असते, हे देखील ‘३ इडियट्स’ सिनेमात योग्य पद्धतीत मांडण्यात आलं. आज जवळपास १३ वर्षांनंतर देखील सिनेमा चाहत्यांच्या आवडीचा आहे.

‘३ इडियट्स’ सिनेमात आमिर खान, शर्मन जोशी, आर माधवन (R Madhavan) यांनी मुख्य भूमिका साकारली. १३ वर्षांनंतर फरहान कुरेशीच्या भूमिकेसाठी आर माधवन ऑडिशन देत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र आर माधवन याने साकारलेल्या फरहान कुरेशीच्या भूमिकेची चर्चा रंगत आहे.

हे सुद्धा वाचा

व्हिडीओमध्ये आर माधवन म्हणजे फरहान कुरेशी त्याच्या वडिलांना इंजिनिअरिंग यामध्ये रस नसून वाईल्ड लाईफ फोटोग्राफीमध्ये करिअर करण्याची इच्छा व्यक्त करतना दिसत आहे. फरहान कुरेशीच्या भूमिकेसाठी आर माधवन याने ऑडिशन दिली होती. सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या ऑडिशनच्या व्हिडीओची चर्चा आहे.

आर माधवन याच्या ऑडिशनचा व्हिडीओ विधू विनोद चोप्रा यांनी फिल्म्सच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवरून व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत विधू विनोद चोप्रा यांनी कॅप्शनमध्ये, ‘फरहान कुरेशीच्या भूमिकेसाठी आर माधवन हाच योग्य होता.’ असं लिहिलं आहे. सध्या सर्वत्र व्हिडीओ व्हायरल होत आहे.

‘३ इडियट्स’ सिनेमात आर माधवन याने साकारलेली फरहान कुरेशी ही भूमिका सर्वांत योग्य होती. कारण आर माधवन याच्या भूमिकेत आई – वडिलांना आपल्या स्वप्नांबद्दल कसं सांगता येईल हे दाखवण्यात आलं आहे. सिनेमात आर माधवन याच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक करण्यात आलं.

‘३ इडियट्स’ (3 Idiots) सिनेमा २५ डिसेंबर २००९ साली प्रदर्शित झाला. सिनेमाचं दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केलं होतं. अभिनेत्री करीना कपूर आणि बोमण ईराणी देखील सिनेमात मुख्य भूमिकेत होते. आता आर माधवन यशराज यांच्या ‘द रेल्वे मॅन’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या नव्या सिनेमाची चर्चा रंगत आहे.

आर माधवन सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असतो. सोशल मीडियावर अभिनेत्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी आर माधवन त्याच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करतो.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.