‘सर हा फोटो डिलिट करा, माझी पत्नी..’; आर. माधवनच्या नव्या फोटोवर नेटकरी असे कमेंट्स का करत आहेत?

आर. माधवनच्या फोटोला असा प्रतिसाद मिळण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्याने शॉवर सेल्फी पोस्ट केला होता. तेव्हा सोशल मीडियावर लाइक्स आणि कमेंट्सचा अक्षरश: पाऊस पडला होता.

'सर हा फोटो डिलिट करा, माझी पत्नी..'; आर. माधवनच्या नव्या फोटोवर नेटकरी असे कमेंट्स का करत आहेत?
R MadhavanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 01, 2023 | 9:28 AM

मुंबई : अभिनेता आर. माधवन आता 52 वर्षांचा असला तरी त्याचा चाहतावर्ग एखाद्या मोठ्या सुपरस्टारइतकाच आहे. आजही माधवन जेव्हा सोशल मीडियावर स्वत:चा एखादा फोटो किंवा सेल्फी पोस्ट करतो, तेव्हा त्यावर क्षणार्धात लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होऊ लागतो. आर. माधवन सध्या त्याच्या एका नव्या प्रोजेक्टसाठी काम करतोय आणि या प्रोजेक्टसाठी त्याने आपला नवा लूक सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ‘अखेर नव्या प्रोजेक्टसाठी नवा लूक, खूप उत्सुक आहे’, असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे. त्याचा हाच नवीन लूक पाहून तरुणी पुन्हा एकदा माधवनवर फिदा झाल्या आहेत.

आर. माधवनचा हा नवीन लूक पाहून तो 52 वर्षांचा आहे, असं किंचितही वाटत नाही. फक्त महिलाच नाही तर पुरुषसुद्धा त्याच्या या फोटोवर कमेंट्स करत आहेत. विशेष म्हणजे काहींनी त्याला हा फोटो डिलिट करण्याची विनंती केली आहे. ‘माझी पत्नी तुमच्याकडे पाहतेय, सर कृपया फोटो डिलिट करा’, असं एकाने लिहिलं आहे. तर ‘100 टक्के या नव्या प्रोजेक्टमध्ये तू पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत असणार’, असा अंदाज दुसऱ्या युजरने वर्तवला आहे.

हे सुद्धा वाचा

सर्वोत्तम वाइनप्रमाणे तुझं वय वाढतंय, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी आर. माधवनच्या लूकचं कौतुक केलंय. ‘थ्री इडियट्स’ या चित्रपटात माधवनच्या मित्राची भूमिका साकारणारा अभिनेता शर्मन जोशीसुद्धा कमेंट करण्यापासून स्वत:ला रोखू शकला नाही. ‘भावा, सुपर दिसतोय’ असं त्याने लिहिलं आहे. इतकंच नव्हे तर ‘रहना है तेरे दिल मै 2’ येतोय का, असाही सवाल चाहत्यांनी केला आहे.

पहा फोटो

View this post on Instagram

A post shared by R. Madhavan (@actormaddy)

आर. माधवनच्या फोटोला असा प्रतिसाद मिळण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्याने शॉवर सेल्फी पोस्ट केला होता. तेव्हा सोशल मीडियावर लाइक्स आणि कमेंट्सचा अक्षरश: पाऊस पडला होता. अभिनेत्री दिया मिर्झानेही त्यावर कमेंट केली होती.

फिटनेसबाबत काय म्हणतो आर. माधवन?

वयाची 50 ओलांडल्यानंतरही अत्यंत फिट दिसणारा आर. माधवन स्वत:ला मात्र तितका फिट मानत नाही. एका मुलाखतीत तो म्हणाला होता, “लोक जशी कल्पना करतात, तितका मी फिट नाहीये. माझ्यापेक्षा जास्त फिट अनिल कपूर आहेत. त्यांचं व्यक्तिमत्त्व अद्भुत आहे.”

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.