AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vedaant Madhavan: आर. माधवनच्या मुलाने जिंकलं सुवर्णपदक; ‘डेन्मार्क ओपन’मध्ये अभूतपूर्व कामगिरी

अभिनेता आर. माधवनचा (R Madhavan) मुलगा वेदांत माधवनने (Vedaant Madhavan) डॅनिश ओपन स्विमिंग (Danish Open swimming) स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलंय. डेन्मार्कच्या कोपनहेगनमध्ये ही स्पर्धा पार पडली.

Vedaant Madhavan: आर. माधवनच्या मुलाने जिंकलं सुवर्णपदक; 'डेन्मार्क ओपन'मध्ये अभूतपूर्व कामगिरी
Vedaant Madhavan wins gold medal Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 18, 2022 | 12:05 PM
Share

अभिनेता आर. माधवनचा (R Madhavan) मुलगा वेदांत माधवनने (Vedaant Madhavan) डॅनिश ओपन स्विमिंग (Danish Open swimming) स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलंय. डेन्मार्कच्या कोपनहेगनमध्ये ही स्पर्धा पार पडली. 800 मीटर पुरुष फ्री-स्टाइल स्विमिंग विभागात वेदांतने सुवर्ण कामगिरी केली आहे. याआधी वेदांतने डेन्मार्क ओपनच्या 1500 मीटर फ्री-स्टाइल जलतरण स्पर्धेत रौप्यपदक जिंकलंय. आपल्या मुलाच्या कामगिरीने भारावलेल्या आर. माधवनने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली. ‘सुवर्णपदक… तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने आणि देवाच्या कृपेने विजयाचा हा प्रवास सुरूच आहे. आज 800 मीटरमध्ये वेदांतने सुवर्णपदक पटकावलंय. या विजयाने मी भारावून गेलो आहे. प्रशिक्षक प्रदीप सर, स्विमिंग फेडरेशन आणि संपूर्ण टीमचे खूप खूप आभार,’ अशा शब्दांत माधवनने त्याचा आनंद व्यक्त केला आहे.

या स्पर्धेत ॲलेक्झांडर एल ब्योर्न याने रौप्यपदक तर फ्रेडरिक लिंडहोमने कांस्यपदक जिंकलंय. आर. माधवनने पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये वेदांत पदक स्वीकारण्यापूर्वी अॅलेक्झांडर आणि फ्रेडरिक यांच्याशी हस्तांदोलन करताना दिसतोय. पदक मिळाल्यानंतर तो विनम्रतेने हात जोडताना पहायला मिळतोय. माधवनने पोस्ट केलेल्या व्हिडीओवर नेटकरी आणि विविध सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

पहा व्हिडीओ-

View this post on Instagram

A post shared by R. Madhavan (@actormaddy)

‘खरंच अभूतपूर्व कामगिरी आहे ही मॅडी. आपल्या सर्वांसाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. वेदांतला खूप खूप शुभेच्छा आणि प्रेम,’ अशी कमेंट अभिनेत्री शिल्पा शिरोडकरने केली. ‘रहना है तेरे दिल मे’ या चित्रपटातील माधवनची सहकलाकार दिया मिर्झाने वेदांतचा हा व्हिडीओ तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केला आहे. ‘वेदांत तुझा खूप अभिमान आहे’, अशा शब्दांत दिया व्यक्त झाली.

वेदांतने यापूर्वी मार्च 2021 मध्ये लॅटव्हिया ओपनमध्ये कांस्यपदक जिंकलं होतं. गेल्या वर्षी ज्युनियर नॅशनल ॲक्वाटिक चॅम्पियनशिपमध्येही त्याने चार रौप्य आणि तीन कांस्यपदके जिंकली होती. भविष्यात ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी पदक जिंकण्याचं त्याचं स्वप्न आहे.

हेही वाचा:

Samantha: ‘आयुष्यात टॅटू कधीच काढू नकोस’; समंथाने चाहत्याला का दिला असा सल्ला?

Yash: कंगना रनौत KGF 2 स्टार यशच्या प्रेमात; चित्रपट पाहिल्यावर म्हणाली..

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.