Shehnaaz Gill | शहनाज गिलला डेट करण्याच्या चर्चांवर अखेर राघव जुयालने सोडलं मौन; स्पष्टच म्हणाला..

'डान्स इंडिया डान्स' या शोमध्ये भाग घेत राघवने करिअरची सुरुवात केली. त्यानंतर त्याने बऱ्याच डान्सिंग शोजचं सूत्रसंचालन केलं. यामध्ये डान्स दिवाने 3 आणि डान्स प्लस 6 यांचा समावेश आहे.

Shehnaaz Gill | शहनाज गिलला डेट करण्याच्या चर्चांवर अखेर राघव जुयालने सोडलं मौन; स्पष्टच म्हणाला..
Raghav Juyal and Shehnaaz GillImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 18, 2023 | 8:40 AM

मुंबई : अभिनेता सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात कलाकारांची मोठी फौज पहायला मिळणार आहे. पूजा हेगडे, व्यंकटेश डग्गुबती, जस्सी गिल, सिद्धार्थ निगम, भूमिका चावला, जगपती बाबू, पलक तिवारी, शहनाज दिल, अभिमन्यू सिंग या कलाकारांनी चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. डान्सर राघव जुयालसुद्धा या चित्रपटात झळकणार आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच डेटिंगच्या चर्चांमुळे राघव प्रकाशझोतात आला आहे. बिग बॉस फेम अभिनेत्री आणि चित्रपटातील सहकलाकार शहनाज गिलसोबत त्याचं नाव जोडलं जातंय. त्यावर आता राघवने अखेर मौन सोडलं आहे.

काय म्हणाला राघव?

‘डीएनए’ला दिलेल्या मुलाखतीत राघव म्हणाला, “इंटरनेटवरील गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचत नाहीत. जोपर्यंत मी स्वत: ते पाहत नाही किंवा ऐकत नाही, तोपर्यंत ते खरं आहे की खोटं ते मला माहीत नाही. मी इथे चित्रपटासाठी आलो आहे आणि मला लोकांनी एक अभिनेता, डान्सर आणि सूत्रसंचालक म्हणून ओळखावं अशीच माझी इच्छा आहे. मी कामातून व्यक्त होतो. बाकी या सर्व गोष्टी (डेटिंगच्या चर्चा) असो किंवा नसो.. आणि हे सर्व शक्यच नाही. कारण माझ्याकडे तेवढा वेळच नाही. मी डबल शिफ्टमध्ये काम करतो. सध्या माझी परिस्थिती अशी आहे की या सर्व गोष्टींसाठी माझ्याकडे वेळच नाही.”

हे सुद्धा वाचा

गेल्या काही दिवसांपासून राघव आणि शहनाज यांच्या डेटिंगच्या जोरदार चर्चा आहेत. इतकंच नव्हे तर हे दोघं लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत, असंही म्हटलं जात होतं. मात्र राघवने शहनाजला डेट करत नसल्याचं सांगत चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

‘डान्स इंडिया डान्स’ या शोमध्ये भाग घेत राघवने करिअरची सुरुवात केली. त्यानंतर त्याने बऱ्याच डान्सिंग शोजचं सूत्रसंचालन केलं. यामध्ये डान्स दिवाने 3 आणि डान्स प्लस 6 यांचा समावेश आहे. याशिवाय त्याने डिस्ने प्लस हॉटस्टारवरील ‘बहुत हुआ सम्मान’मध्येही भूमिका साकारली होती. आता सलमानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात तो महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट येत्या 21 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.