रणबीर-आलिया नाही तर, कपूर कुटुंबातील या व्यक्तीवर राहा करते प्रचंड प्रेम
राहा कपूर हिच्या जन्मानंतर कपूर आणि भट्ट कुटुंबात आनंदाचं वातावरण, पण कपूर कुटुंबातील फक्त 'या' व्यक्तीचा आवाज ओळखते आलिया - रणबीर यांची लेक राहा
मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. सध्या आलिया – रणबीर त्यांच्या मुलगी राहा कपूरमुळे तुफान चर्चेत आहेत. कोणत्याही ठिकाणी दोघांना स्पॉट केल्यानंतर त्यांना सर्वप्रथम राहाबद्दल विचारणा करण्यात येते. ६ नोव्हेंबर २०२३ मध्ये आलियाने गोंडस मुलीला जन्म दिला. पण लेकीच्या जन्मनंतर आलिया – रणबीरने लेकीचा चेहरा चाहत्यांना दाखवला नाही. पण राहाबद्दल अनेक गोष्टी आता समोर येत असतात. राहा कपूर हिच्या जन्मानंतर कपूर आणि भट्ट कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. भट्ट आणि कपूर कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला स्पॉट करण्यात आल्यानंतर सर्वप्रथम राहा हिच्याबद्दल सर्वांना विचारण्यात येतं.
नुकताच मिळालेल्या माहितीनुसार, राहा आई – वडील आलिया – रणबीर यांच्यावर नाही तर, कपूर कुटुंबातील खास व्यक्तीवर अधिक प्रेम करते. कपूर कुटुंबातील सर्वात लहान सदस्य म्हणजे राहा कपूर. राहावर कपूर कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती प्रचंड प्रेम करते. आलिया देखील राहाबद्दल कायम उत्सुक असते.
रणबीर – आलिया दोघेही राहा हिच्यावर प्रचंड प्रेम करतात. पण राहा मात्र आई – वडील नाही, तर राहा कुटुंबातील खास व्यक्तीवर प्रेम करते. राहा कपूर कुटुंबातील ज्या व्यक्तीवर प्रेम करते, ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून राहा हिची आजी नीतू कपूर आहेत. राहा आजी नितू कपूर यांच्यावर प्रचंड प्रेम करते.
राहा आजीवर फक्त प्रेमच करत नाही तर, आजीचा आवाज देखील ओळखते. नीतू कपूर यांचा आवाज आता राहाच्या ओळखीचा झाला आहे. जेव्हा आलियाने राहाला जन्म दिला, तेव्हा नीतू कपूर यांनी सर्वांसमोर आनंद व्यक्त केला. आलियाने सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलगी झाल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली.
View this post on Instagram
पण अद्याप लेक राहा कपूर हिचा चेहरा चाहत्यांना दाखवलेला नाही. एका कर्यक्रमात रणबीरने त्याच्या मोबाईलमध्ये असलेल्या राहाचा क्यूट फोटो फोटोग्राफर्सना दाखवला. रणबीरने राहाचा फोटो दाखवल्यानंतर नीतू कपूर यांनी फोटोग्राफर्सना फोटो पब्लिक न करण्याची विनंती केली. रणबीर आणि आलिया राहासाठी ‘नो फोटो पॉलिसी’ कायम ठेवणार आहेत.