‘ढसाढसा रडला, ३ – ४ तास एक शब्दही बोलला नाही’, लेकीला पाहिल्यानंतर अशी झाली गायकाची अवस्था

लेकीला पहिल्यांदा पाहिल्यानंतर ढसाढसा रडला 'हा' प्रसिद्ध गायक... वडिलांच्या भावना व्यक्त करत म्हणाला...; सोशल मीडियावर खास पोस्ट करत गायकाने चाहत्यांसोबत आनंद केला शेअर... सध्या सर्वत्र गायक आणि त्याच्या लेकीचीच चर्चा.. वडिलांच्या भावना व्यक्त करत म्हणाला...

'ढसाढसा रडला, ३ - ४ तास एक शब्दही बोलला नाही', लेकीला पाहिल्यानंतर अशी झाली गायकाची अवस्था
Follow us
| Updated on: Sep 22, 2023 | 1:07 PM

मुंबई : 22 सप्टेंबर 2023 | आई – वडिलांसाठी त्यांचं मुलंच सर्वकाही असतात. मुलांचं प्रत्येक स्वप्नपूर्ण करण्यासाठी आई – वडील कष्ट करतात. सेलिब्रिटी देखील त्यांच्या मुलांसाठी दिवस-रात्र मेहनत करत असतात. अशात पहिल्यांदा आई – वडील झाल्याचा अनुभव देखील फार वेगळा आणि आनंदायी असतो. नुकताच अभिनेत्री दिशा परमार हिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. अभिनेत्री दिशा परमार आणि गायक राहुल वैद्य पहिल्यांदा आई – वडील झालं आहेत. पहिल्यांदा लेकीला पाहिल्यानंतर राहुल ढसा-ढसा रडला. राहुल म्हणाला, ‘लेकीला पाहिल्यानंतर माझ्या भावना फार वेगळ्या होत्या. मी त्या शब्दात सांगू शकत नाही. मुलीचा जन्म उत्तम वेळी झाला आहे. माझ्या घरी गणरायासोबतच लक्ष्मीचं देखील आगमन झालं आहे. माझी मुलगी आणि पत्नी दोघींची प्रकृती स्थिर आहे…’ असं देखील अभिनेता म्हणाला.

दिशा आणि राहुल यांच्या आयुष्यात २० सप्टेंबर चिमुकलीचं आगमन झालं. राहुल याने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. लेकीच्या जन्मानंतर झालेल्या मुलाखतीत राहुल म्हणाला, ‘मी प्रचंड आनंदी होतो. तीन – चार तास मी काहीही बोललो नाही. मला कळतच नव्हतं नक्की काय होत आहे. लेकीच्या जन्मानंतर मी पाच ते सहा वेळा रडलो आहे…’ असं देखील राहुल म्हणाला.

‘जेव्हा मी माझ्या मुलीकडे पाहतो तेव्हा मला रडायला येतं. मला प्रचंड चांगलं वाटत आहे. आपल्याला वाटतं काय फक्त डिलिव्हरीच होणार आहे. पण सत्यात आल्यानंतर जी परिस्थिती असते ती फार वेगळी असते… त्या भावना आपण कधीही विसरू शकत नाही. मी बाबा झालो आहे, यावर माझा आता ही विश्वास बसत नाहीये…’

हे सुद्धा वाचा

‘मला एक मुलगी झाली आहे. मी बाबा झालो आहे.. मला काहीही वाटत नव्हतं. पण जेव्हा फॉर्मवर सही करण्याची वेळ आली तेव्हा बाळाच्या वडिलांचं नाव लिहियाचं होतं. तेव्हा मला वाटलं हे सगळं माझ्यासोबत होत आहे…’ असं देखील राहुल म्हणाला. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त राहुल, दिशा आणि त्यांच्या लेकीची चर्चा रंगली आहे…

वाढदिवसाबद्दल अभिनेत्याने केलं वक्तव्य

राहुल २३ सप्टेंबर रोजी ३६ वर्षांचा होणार आहे. यावर अभिनेता म्हणाला, ‘यंदाच्या वर्षाचा वाढदिवस माझ्यासाठी अत्यंत खास असणार आहे. कारण दिशा आणि माझ्या मुलीला एकाच दिवशी डिसर्चाज मिळणार आहे. तर माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी दोघींचं घरात स्वागत करण्यासाठी सज्ज आहे…’ असं देखील गायक राहुल वैद्य म्हणाला.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.