‘निकाह’नंतर एका रात्रीत स्टार झाली ‘ही’ अभिनेत्री; ४ वेळा प्रेम तर दुसऱ्या घटस्फोटानंतर करियर उद्ध्वस्त
४ वेळा प्रेम तर दुसऱ्या घटस्फोटानंतर करियर उद्ध्वस्त... बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री अचानक झाली गायब! एका रात्रीत स्टार तर झाली पण...
मुंबई | बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख तयार करत असताना अभिनेत्रींनी अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. पण प्रत्येक संकटांवर मात करत अनेक अभिनेत्रींनी बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम केलं. यशाच्या शिखरावर चढत असताना अभिनेत्रींच्या आयुष्यात खास व्यक्तीची एन्ट्री देखील झाली. पण अभिनेत्रींचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे सलमा आगा (Salma Agha).. सलमा आगा यांनी १९८० -९० च्या दशकात एकापेक्षा एक भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आजही सलमा आगा बॉलिवूडमध्ये सक्रिय नसल्या तरी, बॉलिवूडच्या अनेक पार्ट्यांमध्ये सलमा आगा दिसतात. सलमा आगा आज फक्त त्यांच्या प्रोफेशनल नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतात.
सलमा आगा यांनी १९८२ साली प्रदर्शित झालेल्या ‘निकाह’ सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. बीआर चोप्रा निर्मित आणि दिग्दर्शित ‘निकाह’ सिनेमात राज बब्बर, दीपक पाराशर मुख्य भूमिकेत होते. ‘निकाह’ सिनेमामुळे सलमा एका रात्रीत स्टार झाल्या. त्यानंतर सलमा यांनी अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात राज्य केलं.
मीडिया रिपोर्टनुसार; राज कपूर यांची नातेवाईक असलेल्या सलमा यांना १९९१ साली प्रदर्शित झालेल्या ‘हीना’ सिनेमातून ब्रेक देण्यात येणार होता. पण राज कपूर यांच्या आजीने असं करण्यापासून कपूर यांच्यावर बंदी घातली. एवढंच नाही तर, अनेक निर्मात्यांना सलमा यांना सिनेमात न घेण्यासाठी सक्त ताकिद देण्यात आली होती. ज्यामुळे बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सलमा यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
अखेर ‘निकाह’ सिनेमातून सलमा यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि सलमा एका रात्रीत स्टार झाल्या. ‘निकाह’ सिनेमानंतर प्रसिद्धी मिळाल्यानंतर सलमा यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. ‘निकाह’ सिनेमानंतर सलमा यांनी ‘कसम पैदा करने वाले की’, ’डिस्को डांसर’ यांसारख्या अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं..
प्रोफेशनल आयुष्यात यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या सलमा यांच्या खासगी आयुष्यात मात्र अनेक चढ – उतार आले. करियर पीकवर असताना सलमा एका श्रीमंत उद्योगपतीच्या प्रेमात पडल्या. सलमा यांच्या आयुष्यात चार वेळा प्रेमाची एन्ट्री झाली. ब्रेकअपच नाही तर, सलमा यांनी दोन वेळा घटस्फोटाचा देखील सामना केला आहे.
सलमा यांचं पहिलं लग्न जावेद शेख यांच्यासोबत झालं होतं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. सलमा यांचं दुसरं लग्न रहमत खान यांच्यासोबत झालं. रहमत खान आणि सलमा यांना एक मुलगा आणि एक मुलगी देखील आहे. पण २०१० मध्ये रहमत खान – सलमा यांचा घटस्फोट झाला. अखेर सलमा यांनी तिसरं लग्न उद्योजक मंजर शाह यांच्यासोबत केलं. सलमा आता कुटुंबासोबत मुंबईत राहत आहेत.