‘याने उर्फी जावेदलाही मागे टाकलं’; राज कुंद्राला अतरंगी अवतार पाहून नेटकरी चक्रावले!

जुलै 2021 मध्ये राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक झाली होती. दोन महिने तुरुंगात राहिल्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली. जामिनाला वर्ष पूर्ण झाल्यानंतर राजने केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) पत्र लिहून या प्रकरणात न्यायाची मागणी केली.

'याने उर्फी जावेदलाही मागे टाकलं'; राज कुंद्राला अतरंगी अवतार पाहून नेटकरी चक्रावले!
Raj KundraImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 16, 2023 | 3:53 PM

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा अनेकदा पापाराझींसमोर मास्कने तोंड लपवताना दिसतो. सुरुवातीला राजच्या चेहऱ्यावरील हे मास्क सर्वसाधारण होते. मात्र नंतर हळूहळू त्याने अजबगजब मास्कने चेहरा पूर्णपणे लपवण्यास सुरुवात केली. आता नुकतंच त्याला मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये पत्नी शिल्पा आणि मुलांसह पाहिलं गेलं. यावेळी राज कुंद्राचा नवीन अवतार पाहून सर्वजण चक्रावले. पापाराझींनी शूट केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत.

एका पापाराझी अकाऊंटवर हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. यामध्ये राज कुंद्रा आणि त्याचा मुलगा गाडीतून बाहेर पडतात. त्यानंतर शिल्पा तिच्या मुलीसोबत पुढे येते. राजने यावेळी एका सुपरहिरोच्या मास्कप्रमाणे दिसणाऱ्या मास्कने आपला चेहरा झाकला होता. ‘मुलं पाहून घाबरत नाहीत का’, असा सवाल कमेंट बॉक्समध्ये एका युजरने केला. तर ‘पॉवर रेंजरचा नवीन सिझन येणार आहे का’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘ही कसली नौटंकी’ असा प्रश्न नेटकऱ्याने केला. तर काहींनी राजच्या या अतरंगी फॅशनची तुलना उर्फी जावेदशीही केली.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

पॉर्नोग्राफी प्रकरणानंतर राजने माध्यमांसमोर आणि पापाराझींसमोर येताना मास्कने चेहरा झाकण्यास सुरुवात केली. यामागचं कारण खुद्द त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं. ‘मी लोकांपासून माझा चेहरा लपवत नाही. पण मला मीडियाने माझे फोटो किंवा व्हिडीओ क्लिक करावे अशी माझी अजिबात इच्छा नाही. मी ज्या मीडिया ट्रायलमधून गेलोय, त्यानंतर ही गोष्ट समजायला तुम्हाला कठीण जाणार नाही’, असं त्याने म्हटलं होतं.

जुलै 2021 मध्ये राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक झाली होती. दोन महिने तुरुंगात राहिल्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली. जामिनाला वर्ष पूर्ण झाल्यानंतर राजने केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) पत्र लिहून या प्रकरणात न्यायाची मागणी केली. मी निर्दोष असून मला या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय, असा दावा त्याने केला होता.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.