AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

shilpa shetty | राज कुंद्राच्या पहिल्या पत्नीबद्दल ड्रायव्हरलाही होता संशय; म्हणाला, ‘बाथरुममध्ये मेहुण्यासोबत…’

shilpa shetty | उद्योजक राज कुंद्रा आज अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्यासोबत आनंदी आयुष्य जगत आहे. पण राज याच्या पहिल्या लग्नात आल्या होत्या अनेक अडचणी.. खुद्द राज कुंद्रा याने एका मुलाखतीत केला होता खळबळजनक खुलासा...

shilpa shetty | राज कुंद्राच्या पहिल्या पत्नीबद्दल ड्रायव्हरलाही होता संशय; म्हणाला, 'बाथरुममध्ये मेहुण्यासोबत…'
| Updated on: Oct 13, 2023 | 12:41 PM
Share

मुंबई | 10 ऑक्टोबर 2023 : अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्यासोबत उद्योजक राज कुंद्रा यांचं दुसरं लग्न आहे. राज कुंद्रा याचं पहिलं लग्न कविता कुंद्रा हिच्यासोबत झालं होतं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. राज आणि कुंद्रा यांना एक मुलगी देखील आहे. राज कुंद्रा आणि कविता यांचा घटस्फोट २००६ मध्ये झाला. घटस्फोटानंतर राज कुंद्रा यांनी पहिल्या पत्नीवर अनेक गंभीर आरोप केले होते. सध्या सर्वत्र राज कुंद्रा याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. राज कुंद्रा याच्या पहिल्या पत्नीचं बहिणीच्या पतीसोबत प्रेमसंबंध होते… यांसारखे गंभीर आरोप केले होते. आज राज कुंद्रा दुसरी पत्नी शिल्पा हिच्यासोबत आनंदी आयुष्य जगत आहेत. पण पहिल्या लग्नात राज कुंद्रा यांनी अनेक चांगल्या – वाईट गोष्टींचा सामना केला.

पहिल्या लग्नाबद्दल राज कुंद्रा म्हणाले, ‘मी, पत्नी, आई-वडील, बहीण आणि तिचा पती अमेरिकेत राहत होतो. कविता माझ्या बहिणीच्या पतीसोबत अधिक वेळ व्यतीत करायची. विशेषतः मी जेव्हा कामासाठी दुसऱ्या देशात जायचो तेव्हा…’ राज कुंद्रा यांनी पत्नीवर अनेक गंभीर आरोप केले होते. पत्नीने फसवणूक केल्याचे आरोप राज कुंद्रा याने केले होते.

पुढे राज कुंद्रा म्हणाले, ‘घरातील प्रत्येकाला तिच्यावर संशय होता. पण मला कोणी काहीही सांगितलं नाही. कुटुंबच नाही तर, माझ्या ड्रायव्हरला देखील दोघांवर संशय यायला लागला होता. पण मी ड्रायव्हरने जे काही सांगितलं त्यावर दुर्लक्ष केलं. कविता कायम माझ्या बहिणीच्या पतीसोबत बाहेर जायची, दोघे एका खोलीत असायचे.. माझ्या बहिणीला देखील संशय येत होता..’

‘एवढं सगळं घडत असताना सर्वांनी एकत्र राहणं शक्य नव्हतं. परिस्थिती पाहता माझी बहीण तिच्या पतीसोबत भारतात आली. त्यानंतर मला कळलं कविता प्रेग्नेंट आहेत. डिलीव्हरीनंतर तिच्या वागणुकीत अनेक बदल झाले होते. अशात माझ्या बहिणीचा मला फोन आला आणि तिने मला सांगितलं तिला एक फोन सापडला आहे. फोनमध्ये अनेक मेसेज आहेत…’

पुढे राज कुंद्रा म्हणाला, ‘मी बहिणीकडून फोन नंबर मागितला. तपास केल्यानंतर मला कळलं तो नंबर माझ्याच घरातील आहे. कविता हिने तिच्या कपाटात एक फोन लपवून ठेवला होता. कविता आणि माझ्या बहिणीचा पती बाथरुममध्ये एकमेकांसोबत बोलायचे.’ या प्रकरणानंतर राज कुंद्रा याने कविता हिच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.