रजनीकांत यांच्या संपत्तीचा आकडा पाहून तुम्हालाही फुटेल घाम; 2000 रुपयांपासून केली होती सुरुवात

रजनीकांत यांना वेगळ्या कोणत्याच ओळखीची गरज नाही. एकेकाळी बस कंडक्टर म्हणून काम करणाऱ्या रजनीकांत यांनी आपल्या दमदार अभिनयकौशल्याची छाप प्रेक्षकांवर सोडली. म्हणूनच केवळ भारतातच नाही तर जगभरात त्यांचे असंख्य चाहते आहेत.

रजनीकांत यांच्या संपत्तीचा आकडा पाहून तुम्हालाही फुटेल घाम; 2000 रुपयांपासून केली होती सुरुवात
Rajinikanth Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 12, 2023 | 8:21 AM

चेन्नई : 12 डिसेंबर 2023 | दक्षिण भारतात ज्यांची देवासारखीच पूजा होते, ज्यांना देवाइतकाच मान मिळतो.. असे सुपरस्टार रजनीकांत यांचा संपूर्ण जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. आज 12 डिसेंबर रोजी त्यांचा 73 वा वाढिदवस आहे. एकेकाळी कंडक्टरची नोकरी करणारी सर्वसामान्य व्यक्ती पुढे जाऊन संपूर्ण जगावर राज्य करेल, याची कोणी कल्पनाही केली नसेल. चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याआधी रजनीकांत हे छोटी-मोठी कामं करून उदरनिर्वाह करायचे. अभिनयात पाऊल ठेवल्यानंतर त्यांना सुरुवातीला फक्त 2000 रुपये मानधन मिळालं होतं. करिअरच्या सुरुवातीला त्यांनी दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्यासोबत काम केलं होतं. यामध्ये ते त्यांच्या सावत्र मुलाच्या भूमिकेत होते. याच भूमिकेसाठी त्यांना दोन हजार रुपये मिळाले होते. सध्या तेच रजनीकांत हे एका चित्रपटासाठी तब्बल 100 कोटी रुपयांपर्यंत मानधन स्वीकारतात. काही दिवसांपूर्वी त्यांचा ‘जेलर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांनी 110 कोटी रुपये फी आकारली होती.

‘फायनान्शिअल एक्स्प्रेस’ने दिलेल्या माहितीनुसार, रजनीकांत यांची एकूण संपत्ती ही 430 कोटी रुपये इतकी आहे. त्यांना महागड्या गाड्यांचाही शौक आहे. यामध्ये 6.5 कोटी रुपये किंमतीची रोल्स रॉयस फँटम आणि 6 कोटी रुपयांची रोल्स रॉयस घोस्ट यांसारख्या महागड्या गाड्यांचा समावेश आहे. याशिवाय त्यांच्याकडे 1.77 पासून 67.90 कोटी रुपयांपर्यंत BMW X5, 2.55 कोटी रुपयांची Mercedes Benz G Wagon, 3.10 कोटी रुपयांची Lamborghini Urus, Premier Padmini, Toyota Innova, आणि Hindustan Motors Ambassador सुद्धा आहेत. तर चेन्नईमधील रजनीकांत यांच्या आलिशान बंगल्याची किंमत जवळपास 35 कोटी रुपये इतकी आहे.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Rajinikanth (@rajinikanth)

रजनीकांत यांच्याबद्दल लोकांमध्ये इतकी क्रेझ आहे की, दक्षिणेत अनेकजण त्यांना ‘देव’ मानतात. शिवाजी राव गायकवाड असं त्यांचं मूळ नाव आहे. रजनीकांत पाच वर्षांचे असताना त्यांची आई जिजाबाई यांचं निधन झालं होतं. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांनी सुरुवातीला कुली म्हणूनही काम केलं होतं. त्यानंतर ते बसमध्ये कंडक्टर म्हणून काम करू लागले होते.

Non Stop LIVE Update
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.