Kantara: ‘कांतारा’ पाहून रजनीकांत यांच्या अंगावर आला काटा! लिहिली भावूक पोस्ट

'कांतारा'च्या ऋषभ शेट्टीला रजनीकांत यांनी केला सलाम

Kantara: 'कांतारा' पाहून रजनीकांत यांच्या अंगावर आला काटा! लिहिली भावूक पोस्ट
Rajinikanth and Rishab ShettyImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 26, 2022 | 6:01 PM

मुंबई- ऋषभ शेट्टी (Rishab Shetty) दिग्दर्शित ‘कांतारा’ (Kantara) या चित्रपटाचीच सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता महिना होत आला आहे. मात्र त्याची क्रेझ सोशल मीडियावर अद्याप कायम आहे. मूळ कन्नड चित्रपटाचं कौतुक बॉलिवूडमधील कलाकारांकडूनही होत आहे. आता ‘थलायवा’ रजनीकांत यांनीसुद्धा कांताराची स्तुती केली आहे. रजनीकांत (Rajinikanth) यांनी ट्विट करत ‘कांतारा’ला ‘मास्टरपीस’ असं म्हटलं आहे. चित्रपटाचा मुख्य अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टीचंही त्यांनी कौतुक केलं आहे. ‘कांतारा’ला सध्या सर्वाधिक IMDb रेटिंग मिळाली आहे.

‘माहीत असण्यापेक्षा माहीत नसलेलं अधिक महत्त्वाचं असतं. ‘कांतारा’ या चित्रपटात या गोष्टीची प्रचिती येते. या चित्रपटाने माझ्या अंगावर अक्षरश: काटा आणला. या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते ऋषभ शेट्टी यांना माझा सलाम. भारतीय सिनेसृष्टीतील हा एक मास्टरपीस आहे. या चित्रपटाच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन’, असं ट्विट रजनीकांत यांनी केलंय.

हे सुद्धा वाचा

याआधी प्रभास, अल्लू अर्जुन, कंगना रनौत, राम गोपाल वर्मा, विवेक अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित कांताराचं तोंडभरून कौतुक केलं. या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात कमाईचा 200 कोटींचा टप्पा पार केला आहे.

सुरुवातीला कांतारा हा चित्रपट फक्त कन्नड भाषेत प्रदर्शित झाला होता. मात्र चित्रपटाला वाढता प्रतिसाद पाहता अखेर निर्मात्यांनी इतर भाषांमध्ये त्याचा डबिंग करण्याचा निर्णय घेतला. कांतारा या कन्नड चित्रपटाला कर्नाटकमध्ये जोरदार प्रतिसाद मिळतोच आहे. पण त्याशिवाय देशातील इतर भागांमध्येही या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. या वर्षभरात आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत कांतारा सध्या आठव्या स्थानी आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.