Aishwaryaa Rajinikanth | रजनीकांत यांच्या मुलीच्या घरी दागिन्यांची चोरी; ‘या’ व्यक्तींवर ऐश्वर्याला संशय

ऐश्वर्या ही सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी आहे. धनुषने 2004 मध्ये ऐश्वर्याशी लग्नगाठ बांधली होती. या दोघांना यात्रा आणि लिंगा अशी दोन मुलं आहेत. 2022 मध्ये या दोघांनी घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं होतं. 18 वर्षांच्या संसारानंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता.

Aishwaryaa Rajinikanth | रजनीकांत यांच्या मुलीच्या घरी दागिन्यांची चोरी; 'या' व्यक्तींवर ऐश्वर्याला संशय
Rajinikanth daughter AishwaryaaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 20, 2023 | 10:26 AM

चेन्नई : थलायवा रजनीकांत यांची मुलगी आणि निर्माती ऐश्वर्या रजनीकांत यांच्या घरातील मौल्यवान दागिने चोरीला गेले आहेत. याप्रकरणी तीनमपेट पोलीस ठाण्यात ऐश्वर्या यांनी तक्रार दाखल केली आहे. चेन्नईमधल्या घरातून डायमंड आणि सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलंय. या दागिन्यांची किंमत जवळपास 3.60 लाख रुपये असून 2019 मध्ये बहीण सौंदर्याच्या लग्नात तिने वापरले होते. एफआयआर कॉपीतील माहितीनुसार, ऐश्वर्या यांनी हे दागिने त्यांच्या लॉकरमध्ये ठेवले होते आणि घरकाम करणाऱ्यांना याविषयीची माहिती होती. घरकाम करणाऱ्या तीन जणांवर ऐश्वर्या यांनी संशय व्यक्त केला आहे.

हरवलेल्या दागिन्यांमध्ये डायमंड सेट, अनकट डायमंड्स, अँटिक गोल्ड दागिने, नवरत्न सेट, अँटिक अनकट डायमंड आणि गोल्ड, आरम नेकलेस आणि बांगड्या यांचा समावेश आहे. बहिणीच्या लग्नात हे दागिने वापरल्यानंतर लॉकरमध्ये ठेवल्याचं ऐश्वर्या यांनी सांगितलं. त्यानंतर 10 फेब्रुवारी रोजी दागिने हरवल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं.

हे सुद्धा वाचा

2019 मध्ये लग्न झाल्यानंतर दागिन्यांचा लॉकर तीन ठिकाणी हलवण्यात आला होता. ऑगस्ट 2021 पर्यंत तो लॉकर सेंट मेरी रोड अपार्टमेंटमध्ये होता. त्यानंतर तो सीआयटी कॉलनीमध्ये हलवण्यात आला. या कॉलनीमध्ये ऐश्वर्या लग्नानंतर अभिनेता धनुषसोबत राहत होती. सप्टेंबर 2021 मध्ये तो लॉकर पुन्हा सेंट मेरी रोड अपार्टमेंटमध्ये नेण्यात आला होता. त्यानंतर 9 एप्रिल 2022 रोजी तो लॉकर रजनीकांत यांच्या पोइस गार्डन रेसिडेन्समध्ये हलवण्यात आला.

या लॉकरची चावी सेंट मेरी रोड अपार्टमेंटमधील कपाटात ठेवल्याची माहिती ऐश्वर्या यांनी दिली. इतकंच नव्हे तर घरातील काही स्टाफलाही याबद्दलची माहिती होती. ऐश्वर्या घरात नसताना स्टाफला तिच्या घरात ये-जा करण्याची परवागनी होती. याप्रकरणी सध्या पोलीस पुढील तपास करत आहेत.

ऐश्वर्या ही साऊथ सुपरस्टार धनुषची पत्नी आहे. 2022 मध्ये या दोघांनी घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं होतं. 18 वर्षांच्या संसारानंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कुटुंबीयांनी समजावल्यानंतर या दोघांचं पुन्हा पॅचअप झाल्याची माहिती समोर आली. ऐश्वर्या ही सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी आहे. धनुषने 2004 मध्ये ऐश्वर्याशी लग्नगाठ बांधली होती. या दोघांना यात्रा आणि लिंगा अशी दोन मुलं आहेत.

मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.