रजनीकांत श्रीदेवीच्या प्रेमात अखंड बुडाले होते; ते प्रपोज करणार तेवढ्यात लाईट गेली अन् सगळंच फिसकटलं,काय आहे तो किस्सा
श्रीदेवीने तिच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तिच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच, अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याचीही लोकांमध्ये खूप चर्चा होती. त्याचवेळी रजनीकांत यांच्या मनातही श्रीदेवीबद्दल प्रेम उमललं होतं. ते श्रीदेवीच्या एवढे प्रेमात होते की ते तिच्याशी लग्नही करणार होते. मात्र ते बोलणी करणार तेवढ्यात लाईट गेली आणि सगळंच फिसकटलं. काय होता तो किस्सा

बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवीच्या अभिनयाप्रमाणेच तिच्या सौंदर्यावर भाळणारेही लाखो होते आणि आजही आहेत. फक्त चाहतेच नाही तर तिच्यासोबत काम करणाऱ्या कोस्टार देखील तिच्या प्रेमात असायचे. त्यातील एक सुपरस्टार अभिनेते म्हणजे रजनीकांत. होय, रजनीकांत हे श्रीदेवीच्या प्रचंड प्रेमात होते. पण त्यांची प्रेम कहाणी पुढे जाऊ शकली नाही.
रजनीकांत यांच्या मनात श्रीदेवीबद्दल प्रेमाची भावना कधी उमलली?
श्रीदेवीने तिच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तिच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच, अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याचीही लोकांमध्ये खूप चर्चा होती. श्रीदेवीचे नाव अभिनेता मिथुन चक्रवर्तीशी जोडले गेले होते, असे म्हटले जात होते की दोघेही त्यांच्या नात्याबद्दल गंभीर होते, तथापि, काही काळानंतर दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले. त्याच दरम्यान रजनीकांत यांच्या मनातही श्रीदेवीबद्दल प्रेमाची भावना होती.
एका चित्रपटात रजनीकांतच्या आईची भूमिका साकारली होती
1975 मध्ये ‘जूली’ या चित्रपटातून श्रीदेवीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. एका क्षणी ती इतकी प्रसिद्ध झाली की तिचा समावेश सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये झाला. एवढंच नाही तर तिला 5 फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. हिंदी चित्रपटांसोबतच या अभिनेत्रीने दक्षिणेतही आपली ओळख निर्माण केली होती. तिने साऊथ सुपरस्टार रजनीकांतसोबत अनेक चित्रपट केले आहेत. विशेष म्हणजे जेव्हा श्रीदेवी फक्त 13 वर्षांची होती, तेव्हा तिने एका चित्रपटात रजनीकांतच्या आईची भूमिका साकारली होती.
हा अभिनेता श्रीदेवीच्या प्रेमात होता.
तेव्हा अनेक चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर रजनीकांत आणि श्रीदेवीची जोडी खूप प्रसिद्ध झाली होती. तथापि, एकत्र काम करताना हा रजनीकांत श्रीदेवीच्या प्रेमात पडले. लेखक आणि दिग्दर्शक के. बालचंदर यांच्या जुन्या मुलाखतीत त्यांनी हे उघड केले आहे. त्यांनी सांगितलं होतं की श्रीदेवी रजनीकांतपेक्षा खूपच लहान होती, म्हणून ते तिची खूप काळजी घेत असत. यासोबतच श्रीदेवी आणि रजनीकांतच्या आईचेही एकमेकांशी खूप चांगले संबंध होते.
रजनीकांत श्रीदेवीच्या घरी जाऊनही लग्नाची बोलणी का करू शकले नाही?
बालचंदर यांनी असेही सांगितले की एकदा रजनीकांतने श्रीदेवीशी लग्नाबद्दल बोलण्याचा निर्णय घेतला होता. रजनीकांत त्यांच्यासोबत श्रीदेवीशीच्या घरी लग्नाची बोलणी करायलाही गेले होते. मात्र ते तिथे पोहोचले आणि तेवढ्यात श्रीदेवीच्या घरातील लाईट अचानक गेली होती. ते पाहून हा चांगला संकेत नसल्याचं मानत रजनीकांत हा विषय न बोलताच तिथून परतले. तथापि, रजनीकांत यांनी श्रीदेवीशी मात्र कायम मैत्रीपूर्ण संबंध ठेवले.