‘सेक्रेड गेम्समधील इंटिमेट सीनमुळे अडल्ट स्टारचा टॅग’; मराठमोळ्या अभिनेत्रीची नाराजी

अभिनेत्री राजश्री देशपांडेनं 'सेक्रेड गेम्स' या गाजलेल्या वेब सीरिजमध्ये नवाजुद्दीन सिद्दिकीची पत्नी सुभद्राची भूमिका साकारली होती. या सीरिजमध्ये दोघांचे काही इंटिमेट सीन्ससुद्धा होते. हे सीन्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. मात्र त्यामुळे झालेल्या हानीबद्दल राजश्री व्यक्त झाली.

'सेक्रेड गेम्समधील इंटिमेट सीनमुळे अडल्ट स्टारचा टॅग'; मराठमोळ्या अभिनेत्रीची नाराजी
Rajshri DeshpandeImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 01, 2024 | 10:55 AM

मुंबई : 1 जानेवारी, 2024 | नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘सेक्रेड गेम्स’ या गाजलेल्या वेब सीरिजमध्ये मराठमोळी अभिनेत्री राजश्री देशपांडेनं नवाजुद्दीन सिद्दिकीच्या पत्नीची भूमिका साकारली होती. या सीरिजमध्ये तिने काही इंटिमेट सीन्सही केल्या होत्या. त्यामुळे ‘सेक्रेड गेम्स’नंतर मला ‘अडल्ट फिल्मस्टार’चा टॅग मिळाल्याची खंत राजश्रीने बोलून दाखवली आहे. या सीरिजमधील नवाजुद्दीनसोबतचे तिचे काही इंटिमेट सीन्स सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राजश्रीने असंही म्हटलंय की तिचे हे सीन्स केवळ व्हायरलच झाले नव्हते तर काहींनी ते मॉर्फ केले आणि काहींनी त्याचा गैरवापरही केला.

“सेक्रेड गेम्सच्या पहिल्या सिझननंतर माझा सीन व्हायरल झाला. नंतर तो मॉर्फ केला गेला आणि प्रत्येक ठिकाणी तो पसरवला गेला. माझ्याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट लिहिल्या गेल्या आहेत. त्या सीरिजमध्ये नवाजनेही काम केलं होतं. पण त्याला कोणीच प्रश्न विचारला नाही. दिग्दर्शक अनुराग कश्यपला त्या सीनबद्दल सवाल केला गेला नाही. पण तू हा सीन का केलास, असा प्रश्न फक्त मलाच विचारला गेला. माझा उल्लेख पॉर्न अभिनेत्री म्हणून केला जाऊ लागला. माझी संपूर्ण ओळख ही सेक्रेड गेम्स अभिनेत्री म्हणून एवढ्यापुरतीच राहिली. ‘ट्रायल बाय फायर’ ही माझी सीरिज उत्तम असूनही तिला सेक्रेड गेम्सइतकी प्रसिद्धी मिळाली नाही”, अशा शब्दांत राजश्रीने नाराजी व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Rajshri (@rajshri_deshpande)

राजश्रीने फेम गेम, ट्रायल बाय फायर यांसारख्या इतरही नेटफ्लिक्स शोजमध्ये काम केलंय. पण जे काही घडलं त्यावरून रडत न बसता चर्चा होणं गरजेचं आहे. बदल घडण्याची खूप गरज आहे, असंही ती म्हणाली. याआधीच्या मुलाखतीतही राजश्री तिच्या करिअरविषयी मोकळेपणे व्यक्त झाली होती. ‘सेक्रेड गेम्स’च्या यशानंतर कशा पद्धतीने तिला फक्त इंटिमेट सीन्सच्या भूमिकांसाठी कॉल्स येऊ लागल्या, याविषयी तिने सांगितलं होतं. ‘सेक्रेड गेम्स’ या सीरिजच्या वेळीच राजश्रीचा मल्याळम चित्रपट ‘एस दुर्गा’सुद्धा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. त्यामुळे इंडस्ट्रीतील बऱ्याच लोकांनी असा अर्थ काढला की राजश्री स्वत:हून वादग्रस्त आणि इंटिमेट भूमिका साकारण्यासाठी इच्छुक आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.