Rakhi Sawant Arrested: राखी सावंतला ‘या’ कारणामुळे अटक; अंधेरी कोर्टासमोर करणार हजर

आंबोली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. एका मॉडेलचा व्हिडीओ व्हायरल केल्याच्या आरोपाखाली राखीला अटक झाली आहे. थोड्याच वेळात तिला अंधेरी कोर्टात हजर केलं जाणार आहे. 

Rakhi Sawant Arrested: राखी सावंतला 'या' कारणामुळे अटक; अंधेरी कोर्टासमोर करणार हजर
Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 19, 2023 | 1:44 PM

मुंबई: टेलिव्हिजनची ‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंतला अटक करण्यात आली आहे. अंबोली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. एका मॉडेलचा प्रायव्हेट व्हिडीओ व्हायरल केल्याच्या आरोपाखाली राखीला अटक झाली आहे. थोड्याच वेळात तिला अंधेरी कोर्टात हजर केलं जाणार आहे. अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोप्राने ट्विट करत याविषयीची माहिती दिली. या ट्विटमध्ये शर्लिनने एफआयआरविषयीही माहिती दिली आहे. शर्लिनच्या तक्रारीनंतरच अंबोली पोलिसांनी राखीला अटक केल्याची माहिती समोर येत आहे.

अंबोली पोलिसांनी एफआयआर 883/2022 संबंधी राखी सावंतला अटक केली आहे. काल राखी सावंतचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला, असं ट्विट शर्लिनने केलं आहे.

हे सुद्धा वाचा

कोण आहे शर्लिन चोप्रा?

शर्लिन चोप्रा ही अभिनेत्री आणि मॉडेल आहे. 2012 मध्ये तिने ‘प्लेबॉय’ मासिकासाठी न्यूड फोटोशूट केलं होतं. त्याच्या दोन वर्षांनंतर तिचे फोटो समोर आले होते. एमटीव्ही स्पिल्ट्सविलाच्या सहाव्या सिझनचं तिने सूत्रसंचालन केलं. तिने बिग बॉसमध्येही भाग घेतला होता.

गेल्या काही दिवसांपासून राखी तिच्या लग्नामुळे चर्चेत आली. बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानीसोबतचे तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सात महिन्यांपूर्वी लग्न केल्याचं राखीने कबुल केलं होतं. मात्र आदिलने सुरुवातीला हे लग्न स्वीकारण्यात नकार दिला होता. त्यानंतर आता राखीसमोर नवी अडचण निर्माण झाली आहे.

लग्नामुळे राखी चर्चेत

आदिल खान दुर्रानी याच्यासोबतच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर राखीने धर्मांतर केल्याचीही कबुली दिली होती. मॅरेज सर्टिफिकेटवर तिचं नाव ‘फातिमा’ असं लिहिण्यात आलं होतं. लग्नासाठी धर्मांतर केल्याचं राखीने स्पष्ट केलं. त्यानंतर ती पापाराझींसमोर हिजाबमध्येही दिसली. इतकंच नव्हे तर पती आदिलसोबत आधी उमराह करण्यासाठी जाणार असल्याचंही तिने म्हटलं आहे.

“आम्ही निकाह केला आहे. आदिलने माझं नाव आता फातिमा असं ठेवलं आहे. मी इस्लाम धर्म स्वीकारला आहे. माझं प्रेम मिळवता यावं म्हणून मला जे करता आलं ते मी केलं. माझ्या पतीला मिळवण्यासाठी मी सर्व काही केलं आहे,” असं देखील राखी म्हणाली.

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....