राखी सावंतची प्रकृती खालावली, होणार शस्त्रक्रिया, अभिनेत्री म्हणाली, ‘मी शेवटपर्यंत लढणार…’
Rakhi Sawant | 'मी कोणाचं वाईट केलं नाही तर...', राखी सावंत हिच्या प्रकृतीबद्दल मोठी माहिती समोर;अभिनेत्री म्हणाली, 'शेवटपर्यंत मी लढणार...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त राखी हिच्या प्रकृतीची चर्चा... चाहत्यांनी देखील व्यक्त केली चिंता... सोशल मीडियावर फोटो व्हायरल
गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री राखी सावंत तिच्या प्रकृतीमुळे चर्चेत आहे. 15 मे रोजी राखी हिच्या छातीत त्रास होऊ लागल्यामुळे अभिनेत्रीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. राखी हिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेव्हा तिचा पहिला पती रितेश देखील तिच्यासोबत होता. आता अभिनेत्रीने स्वतःच्या प्रकृतीबद्दल मोठी माहिती दिली आहे. लवकरच राखी हिच्यावर शस्त्रक्रिया पार पडणार आहे. शिवाय मी शेवटपर्यंत लढणार… असं देखील राखी म्हणाली.
राखी स्वतःच्या प्रकृतीबद्दल सांगतना म्हणाली, ‘माझी प्रकृती लवकरच ठिक होणार आहे. मी कधी कोणाचं वाईट केलं नाही, तर माझं देखील काहीही वाईट होणार नाही. शनिवार 18 मे रोजी डॉक्टर शस्त्रक्रिया करणार आहेत. 10 सेंटीमिटरचा ट्यूमर आहे. मी सध्या जास्त काहीही बोलू शकत नाही. रितेश तुम्हाला रुग्णालयाचा पत्ता देईल…
‘शस्त्रक्रिया करून ट्यूमर काढण्यात येणार आहे. सध्या मी डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. शस्त्रक्रियेपूर्वी अनेक गोष्टींची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. बीपी आणि इतर शारीरिक गोष्टींचा तपासणी होणार आहे. शनिवारी शस्त्रक्रिया पार पडणार आहे. देशातील उत्तम डॉक्टरांकडे उपचार सुरु आहेत. सर्वकाही चांगलं होणार आहे. काळजी करण्याचं काहीही कारण नाही…
View this post on Instagram
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘मी लहानपणापासून अनेक संकटांचा सामना केला आहे. पण मी कधीच हारली नाही. मी ऑपरेशन थिएटरमध्ये देखील लढणार आहे. मला काहीही होणार नाही. माझ्या आईचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत. मी लवकरच बरी होणार आणि लोकांचं मनोरंजन करणार.
राखी हिला नक्की काय झालं होतं?
अभिनेत्री म्हणाली, ‘त्या दिवशी मी सकाळी डान्स करत होती. घरी आल्यानंतर मला त्रास होऊ लागला. मी बेशुद्ध झाली. रितेश तात्काळ मला रुग्णालयात घेऊन आला. तेव्हा कळलं ट्यूमर आहे. पण मला विश्वास आहे. मी लवकरच पूर्वीसारखी होणार… सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त राखी हिच्या प्रकृतीची चर्चा रंगली आहे.
काही दिवसांपूर्वी राखी हिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. फोटोमध्ये अभिनेत्री रुग्णालयात असल्याचं चित्र दिसून आलं. ज्यामुळे चाहत्यांनी देखील चिंता व्यक्त केली. राखीचे काही फोटो सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये ती हॉस्पिटलमध्ये असून एका बेडवर झोपलेली दिसत्ये. तब्येत खराब झाल्यामुळे राखीला अचानाक रुग्णालयात दाखल करावं लागल्याची माहिती मिळत आहे.