Rakhi Sawant Wedding: राखी सावंतने बॉयफ्रेंड आदिलशी केलं लग्न? गळ्यात वरमाळा घातलेला फोटो व्हायरल

राखी सावंतने चाहत्यांना दिला धक्का; बॉयफ्रेंड आदिलशी गुपचूप उरकलं लग्न? व्हायरल फोटोंवर शुभेच्छांचा वर्षाव

Rakhi Sawant Wedding: राखी सावंतने बॉयफ्रेंड आदिलशी केलं लग्न? गळ्यात वरमाळा घातलेला फोटो व्हायरल
राखी सावंतच्या लग्नाचे फोटो व्हायरलImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 11, 2023 | 11:00 AM

मुंबई: ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंतने (Rakhi Sawant) बॉयफ्रेंड आदिल दुर्रानी याच्याशी गुपचूप लग्न केल्याचं कळतंय. या दोघांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये दोघांच्याही गळ्यात वरमाळा आणि हातात मॅरेज सर्टिफिकेट पहायला मिळत आहे. मात्र या लग्नाविषयी राखी किंवा आदिलकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

या व्हायरल फोटोंमध्ये राखी पारंपरिक ड्रेसमध्ये दिसतेय, तिच्यासोबत बॉयफ्रेंड आदिल दुर्रानीसुद्धा आहे. दोघांच्याही गळ्यात वरमाळा आहेत. यातील एका फोटोमध्ये दोघं मॅरेज सर्टिफिकेटवर सही करताना दिसत आहेत. इतकंच नव्हे तर या दोघांचं मॅरेज सर्टिफिकेटसुद्धा व्हायरल होत आहे.

हे सुद्धा वाचा

या मॅरेज सर्टिफिकेटमध्ये लग्नाची तारीख 29 मे 2022 लिहिलेलं दिसत आहे. त्यावर 2 जुलै 2022 ही दुसरी तारीखसुद्धा पहायला मिळत आहे. त्यामुळे गेल्याच वर्षी या दोघांनी लग्न केलं का, असाही प्रश्न चाहते उपस्थित करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by FILMYWAVE (@filmywave)

राखीने 2019 मध्ये NRI रितेशशी लग्न केलं होतं. हे दोघं बिग बॉस या शोमध्ये झळकले होते. मात्र 2022 मध्ये हे दोघं विभक्त झाले. त्याच वर्षापासून राखीने आदिलला डेट करणं सुरू केलं.

कोण आहे आदिल दुर्रानी?

राखी सावंतसोबत अनेकदा आदिलला पाहिलं गेलं. आदिल हा बिझनेसमन आहे. त्याच्या लिंक्ड इन प्रोफाइलनुसार, तो ‘युझ्ड कार’ या मैसूरमधील व्यवसायाचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे. त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर अनेक महागड्या गाड्यांचे फोटो पहायला मिळतात. इन्स्टाग्रामवर त्याचे लाखो फॉलोअर्स आहेत.

आदिल हा राखीपेक्षा वयाने 6 वर्षांनी लहान आहे. त्याच्याविषयी बोलताना राखी एका मुलाखतीत म्हणाली होती, “आदिलला देवाने माझ्यासाठी पाठवलं आहे. रितेशसोबत ब्रेकअप झाल्यानंतर मी डिप्रेशनमध्ये गेले होते. माझी तब्येत ठीक नव्हती आणि अशा कठीण काळात आदिलने माझ्या आयुष्यात प्रवेश केला.”

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.