Rakhi Sawant | राखी सावंतच्या पतीला अटक; आदिलवर गंभीर आरोप करत दाखल केली होती FIR

पतीच्या अटकेनंतर माध्यमांशी बोलताना राखी म्हणाली, "हे काही नाटक नाही. त्याने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. त्याने मला मारलं, माझ्या पैशांचा गैरवापर केला. त्याने माझी फसवणूक केली." पोलिसांकडे सर्व पुरावे सुपूर्द केल्याचंही राखीने स्पष्ट केलं.

Rakhi Sawant | राखी सावंतच्या पतीला अटक; आदिलवर गंभीर आरोप करत दाखल केली होती FIR
Adil Khan Durrani, Rakhi sawant
Follow us
| Updated on: Feb 07, 2023 | 2:43 PM

मुंबई: अभिनेत्री राखी सावंतचा पती आदिल खान दुर्रानी याला ओशिवरा पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर येत आहे. राखीनेच तिच्या पतीविरोधात एफआयआर दाखल केली होती. “गेल्या वर्षी बिग बॉस मराठी शोमध्ये असताना आदिलने माझ्या पैशांचा गैरवापर केला. त्याला मी माझ्या आईची काळजी घेण्यास सांगितलं होतं. मात्र त्याच्यामुळे माझ्या आईचं निधन झालं. कारण त्याने सर्जरीसाठी वेळीच डॉक्टरांना पैसे दिले नाहीत,” असे आरोप राखीने आदिलवर केले आहेत. राखीची आई जया यांचं 29 जानेवारी रोजी निधन झालं. त्या कॅन्सर आणि ब्रेन ट्युमरने ग्रस्त होत्या.

राखीला भेटण्यासाठी आदिल जेव्हा तिच्या घरी गेला, तेव्हा पोलिसांनी त्याला अटक केली. पतीच्या अटकेनंतर माध्यमांशी बोलताना राखी म्हणाली, “हे काही नाटक नाही. त्याने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. त्याने मला मारलं, माझ्या पैशांचा गैरवापर केला. त्याने माझी फसवणूक केली.” पोलिसांकडे सर्व पुरावे सुपूर्द केल्याचंही राखीने स्पष्ट केलं.

हे सुद्धा वाचा

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राखी म्हणाली, “आज सकाळी तो माझ्या घरी आला आणि मला मारहाण करू लागला. मी लगेच पोलिसांना कॉल केला आणि त्यांनी त्याला अटक केली. दोन दिवस आधीच मी त्याच्याविरोधात एफआयआर दाखल केली होती. मी याच्याआधीही दोन वेळा आदिलविरोधात खटला दाखल केला होता. मात्र माध्यमांसमोर कधीच त्याचा उल्लेख केला नव्हता. पोलिसांनी त्यावेळी त्याला समजावलं होतं.”

गेल्या आठवड्यात राखीने पापाराझींसमोर आदिलवर विवाहबाह्य संबंध असल्याचाही आरोप केला होता. आदिलच्या गर्लफ्रेंडचं नावसुद्धा तिने एका व्हिडीओतून जाहीर केलं होतं. या सर्व वादादरम्यान सोमवारी राखी आणि आदिल हे त्यांच्या मित्रमैत्रिणींसोबत डिनरला गेल्याचं पहायला मिळालं. सोशल मीडियावरील या व्हिडीओमध्ये आदिल राखीला त्याच्या हाताने जेवण भरवातना दिसतोय.

आदिलसोबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राखीने त्यावर कमेंट केली. ‘होय, तो माफी मागायला आला होता, मात्र मी कधीच त्याला माफ करणार नाही’, असं तिने लिहिलं होतं.

राखी आणि आदिलचं लग्न

राखी आणि आदिलच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून ही जोडी सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे. सुरुवातीला आदिलने हे लग्न स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हासुद्धा राखीने त्याच्यावर आरोप केले होते. नंतर काही दिवसांनी आदिल आणि राखी पुन्हा एकमेकांसोबत प्रेमाने वागताना दिसले.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.