Rakhi Sawant | “राखी नाही फातिमा म्हणा..”; उमराह करून परतल्यानंतर राखी सावंतचा नवीन ड्रामा

राखी सावंत गेल्या आठवड्यात उमराह करण्यासाठी मक्का याठिकाणी गेली होती. तिथून परतल्यानंतर एअरपोर्टवर तिचा वेगळाच अंदाज पहायला मिळाला. यावेळी तिने पापाराझींना 'फातिमा' या नावाने हाक मारण्यास सांगितलं.

Rakhi Sawant | राखी नाही फातिमा म्हणा..; उमराह करून परतल्यानंतर राखी सावंतचा नवीन ड्रामा
Rakhi SawantImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 31, 2023 | 12:06 PM

मुंबई | 31 ऑगस्ट 2023 : अभिनेत्री राखी सावंत ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाते. सोशल मीडियावर दर दोन दिवसाआड तिचा नवीन ड्रामा पहायला मिळतो. काही दिवसांपूर्वीच तिचा पूर्व पती आदिल खानने तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पत्रकार परिषद घेत राखीवर गंभीर आरोप केले. त्यानंतर राखी थेट उमराह करण्यासाठी मक्का याठिकाणी गेली. उमराह केल्यानंतर ती आता परत मुंबईत परतली आहे. यावेळी एअरपोर्टवर तिच्या स्वागतासाठी तिचे काही मित्र पोहोचले. त्यांनी राखीचं फुलांच्या माळांनी स्वागत केलं. यावेळी पापाराझी जेव्हा तिला ‘राखी.. राखी’ म्हणून हाक मारू लागले, तेव्हा ती त्यांना “राखी नाही तर फातिमा बोला” असं म्हणाली. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

उमराह करून परतली राखी

गेल्या आठवड्यात राखी उमराह करण्यासाठी मक्क्याला गेली होती. तिथूनही तिने सोशल मीडियावर काही व्हिडीओ पोस्ट केले होते. यातील एका व्हिडीओमध्ये ती उमराह करताना रडताना दिसली. त्यावरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोलसुद्धा केलं. आता तिथून परतल्यानंतर एअरपोर्टवर राखीचा नवा ड्रामा पहायला मिळाला. राखीला एअरपोर्टवरून घ्यायला आलेल्या मित्रांनी तिच्या गळ्यात हार टाकण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिने त्यांना रोखलं. ते हार तिने हातातच घेतले आणि नंतर एका मुलीच्या हातून तिने ते गळ्यात घातले. यानंतर तिने फातिमा नावाने हाक मारण्याच्या सूचना पापाराझींना दिल्या.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

राखी नाव बदलणार?

राखीला जेव्हा एका पापाराझीने विचारलं की, “तू कागदोपत्रीही तुझं नाव बदलशील का?” त्यावर राखी म्हणाली, “नाही, देवाने मला असंच बनवलं आहे. मी जशी आहे त्यावरच ते प्रेम करतात. मी डॉक्युमेंट्समध्ये नाव बदलावं अशी त्यांची इच्छा नाही.” राखीने आदिल खान दुर्रानीशी लग्न केल्यानंतर इस्लाम धर्म स्वीकारला होता. काही महिन्यांपूर्वी आदिलवर एका तरुणीने बलात्काराचा आरोप केला. त्यानंतर त्याला अटक झाली होती.

आदिलने तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्याने राखीविषयी काही धक्कादायक खुलासे केले होते. राखीने तिचा पहिला पती रितेशला अद्याप घटस्फोट दिला नसल्याचंही त्याने सांगितलं होतं.

बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान
बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान.
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.