Rakhi Sawant: देशातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती करतेय राखी सावंतच्या आईची मदत; उचलला उपचाराचा खर्च

राखी सावंतच्या आईला आधीच कॅन्सर होता. त्यानंतर आता त्यांना ब्रेन ट्युमरसुद्धा झाला आहे. काही दिवसांपूर्वीच राखीचा रुग्णालयातून रडतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

Rakhi Sawant: देशातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती करतेय राखी सावंतच्या आईची मदत; उचलला उपचाराचा खर्च
Rakhi Sawant: आईची अवस्था पाहून राखी सावंतला कोसळलं रडूImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 18, 2023 | 9:19 AM

मुंबई: ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणाऱ्या राखी सावंतच्या खासगी आयुष्यात सध्या बऱ्याच समस्या निर्माण झाल्या आहेत. एकीकडे तिच्या लग्नावरून तणाव असताना दुसरीकडे तिच्या आईची प्रकृती खालावली आहे. राखी सावंतच्या आईला आधीच कॅन्सर होता. त्यानंतर आता त्यांना ब्रेन ट्युमरसुद्धा झाला आहे. काही दिवसांपूर्वीच राखीचा रुग्णालयातून रडतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. राखीची आई सध्या रुग्णालयातच असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याआधी सलमान खाननेही तिची आर्थिक मदत केली होती. आता देशातील सर्वांत श्रीमंत व्यक्तीने आईच्या उपचारासाठी मदतीचा हात पुढे केल्याचं कळतंय.

“माझी आई लोकांना ओळखू शकत नाहीये. ती खाऊ-पिऊही शकत नाहीये. तिला अर्धांगवायूचा झटका आला होता. मी मुकेश अंबानी यांचे आभार मानते. कारण त्यांनी आईच्या उपचारासाठी माझी मोठी मदत केली. आईच्या उपचाराचा खर्चसुद्धा त्यांनी कमी केला आहे”, असं राखीने सांगितलं.

हे सुद्धा वाचा

राखीच्या आईला दोन महिन्यांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिचा व्हिडीओ समोर येताच चाहत्यांनी तिच्या आईच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे. गेल्या काही दिवसांपासून राखी बिग बॉसच्या घरात होती. ग्रँड फिनाले पार पडल्यानंतर राखीने सर्वात आधी तिच्या आईची भेट घेतली. “घरी आल्यावर मला समजलं की आईची तब्येत बरी नाही. आम्ही आता रुग्णालयात आहोत. आईला कॅन्सर आहे आणि आता ब्रेन ट्युमरचंही निदान झालं आहे. तुम्ही कृपया त्यांच्यासाठी प्रार्थना करा. माझ्या आईला प्रार्थनेची फार गरज आहे”, असं म्हणत ती ढसाढसा रडली होती.

गायिका अफसाना खान, अभिनेत्री महिमा चौधरी, सोफिया हयात यांनी कमेंट करत राखीच्या आईच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली. राखीच्या अनेक चाहत्यांनीही तिला खचून न जाण्याचं आवाहन केलं. याआधी राखी बिग बॉसच्या 14 व्या पर्वात दिसली होती. या शोमधून मिळालेल्या पैशांनी आईच्या कॅन्सरवर उपचार करणार असल्याचं तिने सांगितलं होतं.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.