Rakhi Sawant | राखी सावंत आणि आदिल दुर्रानी यांच्यामधील वाद पेटला, मारहाणीचा गंभीर आरोप, थेट म्हणाला, अशा महिलांना

राखी सावंत ही नेहमीच चर्चेत असते. राखी सावंत हिने काही दिवसांपूर्वीच पती आदिल याच्यावर अनेक गंभीर आरोप केले. यानंतर आदिल दुर्रानी याला थेट जेलमध्ये जाण्याची वेळ आली. आता राखी सावंत हिचा पती आदिल हा अत्यंत मोठे खुलासे हे राखीबद्दल करताना दिसत आहे.

Rakhi Sawant | राखी सावंत आणि आदिल दुर्रानी यांच्यामधील वाद पेटला, मारहाणीचा गंभीर आरोप, थेट म्हणाला, अशा महिलांना
Follow us
| Updated on: Aug 21, 2023 | 5:01 PM

मुंबई : राखी सावंत ही गेल्या काही दिवसांपासून मोठा चर्चेचा विषय ठरलीये. राखी सावंत (Rakhi Sawant) हिने सर्वांनाच मोठा धक्का देत आपण काही महिन्यांपूर्वीच लग्न केल्याचे जाहिर केले. इतकेच नाही तर या पोस्टसोबतच राखी सावंत हिने लग्नाचे काही फोटो आणि व्हिडीओ हे देखील शेअर केले. यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला. राखी सावंत हिने आदिल दुर्रानी खान (Adil Durrani Khan) या व्यक्तीसोबत लग्न केले. अगोदर कोर्टात लग्न केले आणि मग निकाह केला. इतकेच नाही तर लग्नानंतर राखी सावंत हिने इस्लाम धर्म देखील स्वीकारला.

आदिल दुर्रानी याच्यासोबत लग्न झाल्यानंतर राखी सावंत हिने आपले नाव फातिमा आदिल दुर्रानी असल्याचे सांगितले. मात्र, आता काही दिवसांपूर्वीच राखी सावंत हिने पती आदिल दुर्रानी याच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले. राखी सावंत हिने घरेलू हिंसापासून अनेक गंभीर आरोप हे आदिल दुर्रानी याच्यावर केले. यानंतर सर्वचजण हैराण झाले.

आदिल दुर्रानी आणि राखी सावंत यांचा वाद थेट पोलिस ठाण्यात जाऊन पोहचला. आदिल दुर्रानी याच्यावर केलेल्या आरोपांनंतर गुन्हा दाखल करत पोलिसांनी आदिल दुर्रानी याला अटक केली. काही दिवस थेट जेलमध्ये राहण्याची वेळ देखील आदिल दुर्रानी याच्यावर आली. आता नुकताच आदिल दुर्रानी हा जेलच्या बाहेर आलाय.

जेल बाहेर आल्यानंतर आदिल दुर्रानी याने सांगितले होते की, आता मी माझ्या साईटची स्टोरी सांगणार आहे. माझ्यासोबत किती जास्त चुकीचे झाले ते. आता नुकताच आदिल दुर्रानी याने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये आदिल दुर्रानी हा अत्यंत मोठे खुलासे करताना दिसला आहे. ज्यामुळे चाहते देखील हैराण झाल्याचे बघायला मिळाले.

आदिल दुर्रानी म्हणाला की, राखी सावंत हिच्यासारख्या महिलांसोबत बोलणे देखील खतरनाक आहे. मुळात म्हणजे माझ्यासोबत लग्न करण्याच्या अगोदर तिचा घटस्फोट हा रितेश याच्यासोबत झाला नव्हता. घटस्फोट झाला नसताना देखील राखी सावंत हिने माझ्यासोबत लग्न केले. यावेळी काही कागदपत्र दाखवताना देखील आदिल दुर्रानी हा दिसला.

पुढे आदिल दुर्रानी हा म्हणाला की, राखी सावंत हिने मला सांगितले होते की, ती युकेला कामानिमित्त जात आहे. मात्र, यावेळी ती रितेश याला भेटण्यासाठी गेली होती आणि ते आठ दिवस एकसोबत होते. मुळात म्हणजे माझ्यासोबत लग्न केल्यानंतरही रितेश आणि राखी हे कायमच संपर्कात होते. मी ज्यावेळी राखीचा मोबाईल बघितला तेंव्हा मला कळाले की, ते आठ दिवस एकसोबत होते.

मग मी राखी सावंत हिला घटस्फोट मागण्यास सुरूवात केली. परंतू तिने थेट मला मारहाण करण्यास सुरूवात केली. पुढे आदिल दुर्रानी म्हणाला, माझ्याकडे एक व्हिडीओ देखील आहे. त्यामध्ये तुम्हाला हे कळू शकते की, माझ्या अंगावर किती जास्त जखमा आहेत. यावेळी तो व्हिडीओ दाखवताना देखील आदिल दुर्रानी हा दिसला. आता अजून काही मोठे खुलासे आदिल दुर्रानी हा करू शकतो.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.