रामचरणच्या बहिणीचा संसार मोडला; लग्नाच्या तीन वर्षांतच पतीला दिला घटस्फोट

बॉलिवूड असो किंवा साऊथ फिल्म इंडस्ट्री.. गेल्या काही वर्षांत बऱ्याच सेलिब्रिटी कपल्सच्या घटस्फोटाच्या बातम्या समोर आल्या आहेत. समंथा रुथ प्रभूपासून ते धनुषपर्यंत, साऊथच्या लोकप्रिय सेलिब्रिटींच्या घटस्फोटाच्या वृत्ताने चाहत्यांना धक्का दिला.

रामचरणच्या बहिणीचा संसार मोडला; लग्नाच्या तीन वर्षांतच पतीला दिला घटस्फोट
RRR फेम रामचरणच्या बहिणीचा घटस्फोटImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 05, 2023 | 11:59 AM

हैदराबाद : RRR फेम रामचरणची चुलत बहीण निहारिका कोनिडेलाने नुकताच तिचा घटस्फोट जाहीर केला. गेल्या महिन्यात निहारिका आणि चैतन्य जोन्नलगड्डा यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला होता. आता ती प्रक्रिया पूर्ण झाली असून दोघं अधिकृतरित्या विभक्त झाले आहेत. मात्र या दोघांनी घटस्फोट का घेतला याचं कारण अद्याप समोर आलं नाही. निहारिका आणि चैतन्य यांनी वैचारिक मतभेदांमुळे विभक्त होण्याचा निर्णय घेतलाय, असंही म्हटलं जात आहे. या घटस्फोटाची माहिती दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित चाहत्यांना दिली आहे.

‘चैतन्य आणि मी परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही दोघं आमच्या वैयक्तिक आयुष्यात पुढे जात असताना तुम्ही सहानुभूती दर्शवावी अशी अपेक्षा करतो. माझा पाठिशी खंबीरपणे उभं राहिल्याबद्दल मी कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांचे आभार मानते. आयुष्यातील या नव्या बदलाला सामोरं जाताना मी तुम्ही माझ्या खासगी आयुष्याचा आदर कराल अशी अपेक्षा करते’, अशी पोस्ट निहारिकाने लिहिली.

हे सुद्धा वाचा

बॉलिवूड असो किंवा साऊथ फिल्म इंडस्ट्री.. गेल्या काही वर्षांत बऱ्याच सेलिब्रिटी कपल्सच्या घटस्फोटाच्या बातम्या समोर आल्या आहेत. समंथा रुथ प्रभूपासून ते धनुषपर्यंत, साऊथच्या लोकप्रिय सेलिब्रिटींच्या घटस्फोटाच्या वृत्ताने चाहत्यांना धक्का दिला. त्यानंतर आता निहारिकाच्या घटस्फोटाच्या वृत्ताने चाहते चकीत झाले आहेत. निहारिका ही मेगास्टार चिरंजीवी यांची पुतणी आहे.

2020 मध्ये राजस्थानमधील उदयपूरमध्ये निहारिका आणि चैतन्यचा शाही विवाहसोहळा पार पडला होता. या लग्नसोहळ्याला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार उपस्थित होते. मात्र आता लग्नाच्या तीन वर्षांतच दोघांनी घटस्फोट घेतला. निहारिकाचे वडील नागेंद्र बाबू हे साऊथचे प्रसिद्ध अभिनेते आहेत. निहारिकाने ‘ओका मनसू’ आणि ‘हॅपी वेडिंग’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. अभिनयासोबतच ती निर्मिती क्षेत्रातही सक्रिय आहे. तर चैतन्यने बिट्स पिलानी आणि इंडियन स्कूल ऑफ बिझनेसमधून शिक्षण पूर्ण केलं. हैदराबादमधील एका मल्टी नॅशनल कंपनीत तो बिझनेस स्ट्रॅटेजिस्ट म्हणून काम करतोय.

'धरण फुटल्यावर कुणीतरी म्हणतं मग...', अजित दादांचा कोणाला खोचक टोला?
'धरण फुटल्यावर कुणीतरी म्हणतं मग...', अजित दादांचा कोणाला खोचक टोला?.
आरक्षणाचा मुद्दा, लक्ष्मण हाके अन् जरांगे पाटलांचे समर्थक आमने-सामने
आरक्षणाचा मुद्दा, लक्ष्मण हाके अन् जरांगे पाटलांचे समर्थक आमने-सामने.
मुस्लीम लांगुलचालनाचा दबाव मान्य नाही, दादांसोबत राणे-सोमय्यांचे खटके
मुस्लीम लांगुलचालनाचा दबाव मान्य नाही, दादांसोबत राणे-सोमय्यांचे खटके.
बुल्डोडर राज नही चलेगा...धारावीत 'मशिदी'वरुन तणाव, BMC ची गाडी फोडली
बुल्डोडर राज नही चलेगा...धारावीत 'मशिदी'वरुन तणाव, BMC ची गाडी फोडली.
राज ठाकरे यांनी केले अत्यंत मोठे विधान, शिवरायांच्या पुतळ्यावर..
राज ठाकरे यांनी केले अत्यंत मोठे विधान, शिवरायांच्या पुतळ्यावर...
नाना पाटेकर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार; कारण काय?
नाना पाटेकर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार; कारण काय?.
म्हणून धारावीत महापालिकेची टीम गेली... फडणवीस काय म्हणाले?
म्हणून धारावीत महापालिकेची टीम गेली... फडणवीस काय म्हणाले?.
भाजपने मित्र बनून मुख्यमंत्र्यांच्या मानेवर सुरी ठेवली : बच्चू कडू
भाजपने मित्र बनून मुख्यमंत्र्यांच्या मानेवर सुरी ठेवली : बच्चू कडू.
फडणवीस साहेब बारीक झालेत नाही का?; नाना पाटेकर यांची मिश्किल टिप्पणी
फडणवीस साहेब बारीक झालेत नाही का?; नाना पाटेकर यांची मिश्किल टिप्पणी.
पुणे विमानतळाला जगदगुरू संत तुकाराम यांचं नाव देणार : फडणवीस
पुणे विमानतळाला जगदगुरू संत तुकाराम यांचं नाव देणार : फडणवीस.