Ram Charan | रामचरणच्या चिमुकल्या मुलीचा फोटो व्हायरल? काय आहे फोटोमागील सत्य?
रामचरण आणि उपासना यांनी 2012 मध्ये लग्न केलं. मात्र बाळाच्या निर्णयासाठी दोघांनी मिळून वेळ घेतला. अखेर लग्नाच्या 11 वर्षांनंतर या दोघांच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे.
मुंबई : साऊथ सुपरस्टार रामचरण आणि त्याची पत्नी उपासना कोनिडेला हे नुकतेच आई-बाबा झाले. लग्नाच्या 11 वर्षांनंतर रामचरणच्या घरात चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं. मेगास्टार चिरंजीवी यांनी ट्विट करत चाहत्यांना याविषयीची माहिती दिली होती. 20 जून रोजी हैदराबादमधील एका खासगी रुग्णालयात उपासनाने गोंडस मुलीला जन्म दिला. आजोबा झालेल्या चिरंजीवी यांनी नातीच्या जन्माची माहिती देताच सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला. त्यानंतर आता एका बाळाचा फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो रामचरण आणि उपासना यांच्या मुलीचा असल्याचं म्हटलं जात आहे.
सोशल मीडियावर हॉस्पिटलमधून एका बाळाचा फोटो व्हायरल होत आहे. ही मुलगी रामचरण आणि उपासना यांची असल्याचं म्हटलं जात आहे. ‘रामचरण अन्नाची मुलगी’ असं या फोटोवर लिहिण्यात आलं आहे. या फोटोवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. मात्र व्हायरल होत असलेल्या या फोटोचं सत्य वेगळंच आहे. हा फोटो रामचरणच्या मुलीचा नाही. रामचरणचा डिजिटल मॅनेजर सिवा चैरी यांनी ट्विट करत फोटोचं सत्य सांगितलं आहे. ‘सोशल मीडियावर जो फोटो व्हायरल होत आहे, तो ‘मेगा प्रिन्सेस’चा (रामचरणची मुलगी) नाही’, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
पहा व्हायरल फोटो-
रामचरण आणि उपासना हे सध्या हैदराबादमध्ये राहतात. मात्र बाळाच्या जन्मानंतर दोघांनी चिरंजीवी आणि सुरेखा यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी बोलताना उपासना एका मुलाखतीत म्हणाली होती, “अनेकजण मुलंबाळं झाल्यानंतर घराबाहेर पडतात. पण आम्ही याविरुद्ध करतोय. आतापर्यंत आम्ही दोघंच राहत होतो. पण बाळाचा जन्म झाल्यानंतर आम्ही रामचरणच्या कुटुंबीयांसोबत राहणार आहोत. बाळासाठी आजी-आजोबाचं महत्त्व खूप असतं. हे मला आणि रामचरणला खूप चांगल्या पद्धतीने माहीत आहे. आमच्या बाळालाही आजी-आजोबाचं भरभरून प्रेम मिळावं, यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे.”
Pics circulating in social media are not the pics of #MegaPrincess
— SivaCherry (@sivacherry9) June 20, 2023
रामचरण आणि उपासना यांनी 2012 मध्ये लग्न केलं. मात्र बाळाच्या निर्णयासाठी दोघांनी मिळून वेळ घेतला. अखेर लग्नाच्या 11 वर्षांनंतर या दोघांच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. याआधी उपासना आई न होण्याच्या निर्णयाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली होती. या निर्णयावरून तिला अनेक प्रश्नांचा सामना करावा लागला होता. अध्यात्मिक गुरू सदगुरू यांच्याशी एका मुलाखतीत बोलताना ती आई न होण्याच्या निर्णयबाबत व्यक्त झाली होती.