Ram Charan: रामचरणच्या पत्नीने आई न होण्याचा घेतला मोठा निर्णय; त्यावर अध्यात्मिक गुरू सद्गुरू म्हणाले..

रामचरण आणि उपासना यांच्या लग्नाला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र उपासनाने आई न होण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावरून तिलाही अनेक प्रश्नांचा सामना करावा लागला आणि अजूनही करावा लागत आहे.

Ram Charan: रामचरणच्या पत्नीने आई न होण्याचा घेतला मोठा निर्णय; त्यावर अध्यात्मिक गुरू सद्गुरू म्हणाले..
रामचरण आणि उपासना यांच्या लग्नाला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र उपासनाने आई न होण्याचा निर्णय घेतला आहे. Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 10, 2022 | 11:11 AM

लग्नानंतर पाळणा हललाच पाहिजे, असा अनेकांचा आग्रह असतो. लग्नानंतर बाळाला जन्म न देण्याचा निर्णय परदेशात अनेक जोडपं घेतात दिसतात. मात्र भारतात आई न होण्याचा निर्णय एखाद्या स्त्रीने घेतल्यास, तिच्यावर असंख्य प्रश्नांचा भडीमार होतो. प्रसंगी कुटुंबीयांकडून दबावही निर्माण केला जातो. असाच एक निर्णय मेगास्टार चिरंजीवी यांची सून आणि प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता रामचरणची (Ram Charan) पत्नी उपासना (Upasana) हिने घेतला आहे. रामचरण आणि उपासना यांच्या लग्नाला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र उपासनाने आई न होण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावरून तिलाही अनेक प्रश्नांचा सामना करावा लागला आणि अजूनही करावा लागत आहे. याविषयी ती नुकत्याच एका कार्यक्रमात मोकळेपणे व्यक्त झाली. अध्यात्मिक गुरू सद्गुरू (Sadhguru) यांनाच तिने त्याबद्दलचा प्रश्न विचारला.

उपासनाने आई न होण्याच्या तिच्या निर्णयाबद्दल आणि त्याबद्दलच्या सामाजिक दबावाबद्दलही या कार्यक्रमात खुलासा केला. त्यावर उत्तर देताना अध्यात्मिक गुरू सद्गुरुंनी तिच्या निर्णयाची प्रशंसा केली. 17 व्या एटीए अधिवेशन आणि युवा परिषदेत सद्गुरूंशी संवाद साधताना उपासनाने त्यांना अनेक प्रश्न विचारले. या चर्चेदरम्यान उपासनाने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रश्न विचारत असल्याचं सद्गुरुंना सांगितलं. “मी माझ्या आतापर्यंतच्या 10 वर्षांच्या वैवाहिक आयुष्यात खूप खूश आहे. मला माझं आयुष्य आवडतंय, माझं कुटुंबीयांवर खूप प्रेम आहे, पण तरीसुद्धा माझ्या RRR बद्दल प्रश्न विचारणं हे आपलं कर्तव्य आहे, असं लोकांना का वाटतं”, असा प्रश्न उपासनाने विचारला. RRR हे रामचरणच्या चित्रपटाचं नाव असलं तरी इथे उपासनाने त्याचा संदर्भ वेगळ्या शब्दांसाठी वापरला आहे. पहिला आर म्हणजे तिचं रिलेशनशिप (relationship), दुसरा आर म्हणजे तिची आई होण्याची क्षमता (ability to reproduce) आणि तिसरा आर म्हणजे आयुष्यातील तिचा रोल (role).

हे सुद्धा वाचा

काय म्हणाले सद्गुरु?

यातून रिलेशनशिपचा प्रश्न बाजूला ठेवू असं सद्गुरु उपासनाच्या प्रश्नाचं उत्तर देताना म्हणाले. दुसऱ्या आर विषयी बोलताना ते पुढे म्हणाले, “आई न होण्याच्या निर्णयावर तुम्ही कायम असाल, तर मी तुमचा पुरस्कार देऊन सत्कार करेन. मी आधीच त्या सर्व तरुणींसाठी हा पुरस्कार जाहीर केला आहे, ज्या निरोगी आहेत आणि आई बनू शकतात परंतु त्यांनी आई न होण्याचा निर्णय घेतला आहे. ही सर्वात मोठी सेवा आहे जी तुम्ही सध्या करू शकता. मानव ही काही लुप्त होणारी किंवा धोक्यात असलेली प्रजाती नाही. उलट आपण असंख्य आहोत. येत्या 30-35 वर्षांत आपण 10 अब्जांच्या दिशेने वाटचाल करत आहोत. मानवाला कार्बन फूटप्रिंटची चिंता आहे पण जर मानवी पावलांचे ठसे कमी झाले तर ग्लोबल वॉर्मिंगचीही काळजी करण्याची गरज नाही. म्हणून ज्या स्त्रियांनी असा निर्णय घेतला आहे, तो चांगला आहे.” सद्गुरुंचं सकारात्मक उत्तर ऐकताच उपासना मस्करीत त्यांना म्हणाली, “मी तुम्हाला लवकरच माझ्या आई आणि सासूंशी बोलायला लावते.”

पहा व्हिडीओ-

उपासना आणि रामचरण यांचं 2012 मध्ये लग्न झालं. त्यांना कोणतंही मूलबाळ नाही. सोशल मीडियावर त्यांचे चाहते अनेकदा पोस्टवर कमेंट करत त्यांना ‘कुटुंब सुरू करण्यासाठी’ आग्रह करतात. उपासना आणि रामचरणने याआधीही मुलं न होऊ देण्याच्या त्यांच्या निर्णयाबद्दल खुलासा केला होता. गेल्या वर्षी एका पत्रकार परिषदेत राम म्हणाला होता, “मेगास्टार चिरंजीवीचा मुलगा म्हणून चाहत्यांना खूश करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. मी फॅमिली प्लॅनिंग केल्यास माझ्या ध्येयापासून मी विचलित होऊ शकतो. उपासनाचीही तिच्या आयुष्यात काही ध्येयं आहेत. त्यामुळे आम्ही काही वर्षे मुलं न होऊ देण्याबाबतचा निर्णय घेतला आहे.” यावर्षी रामचरणचे दोन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले. एस. एस. राजामौली दिग्दर्शित RRR या त्याच्या चित्रपटाने जगभरात 1100 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर आचार्य या चित्रपटात त्याने वडील चिरंजीवीसोबत काम केलं.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.