The Kerala Story चित्रपटावरून राम गोपाल वर्मा यांची बॉलिवूडला चपराक; म्हणाले ‘मृत्यूसारखं मौन पाहून..’

चित्रपटात सांगितलेला 32 हजार महिलांचा आकडा, धर्मांतर या सर्व मुद्द्यांवरून चित्रपटाच्या निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना घेरण्यात येतंय. यावर अखेर दिग्दर्शक सुदिप्तो सेन आणि निर्माते विपुल शाह यांनी मौन सोडलं आहे.

The Kerala Story चित्रपटावरून राम गोपाल वर्मा यांची बॉलिवूडला चपराक; म्हणाले 'मृत्यूसारखं मौन पाहून..'
Ram Gopal Varma supports The Kerala Story Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 22, 2023 | 9:08 AM

मुंबई : निर्माते, दिग्दर्शक राम गोपाल वर्मा हे त्यांच्या चित्रपटांसोबतच वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असतात. नुकतंच त्यांनी ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाबाबत काही ट्विट्स केले आहेत. हे त्यांचे ट्विट्स सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. देशभरात वाद सुरू असलेल्या या चित्रपटाचं समर्थन करतानाच त्यांनी बॉलिवूडवर निशाणा साधला आहे. ‘द केरळ स्टोरी’च्या यशाबाबत बॉलिवूडने बाळगलेल्या मौनावरून त्यांनी चपराक लगावली आहे. सुदिप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे. तिसऱ्या आठवड्याअखेर या चित्रपटाने 180 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. देशभरातील वाद, विरोध, बॉयकॉट आणि समर्थन यांमध्ये अडकलेल्या या चित्रपटाला पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय.

काय म्हणाले राम गोपाल वर्मा?

राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या ट्विटमधून बॉलिवूडला आरसा दाखवला आहे. ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाबाबत त्यांनी काही ट्विट्स केले आहेत. यामध्ये त्यांनी लिहिलंय, ‘आपण इतरांशी आणि स्वत:शी खोटं बोलण्यात इतके सहज झालो आहोत की जेव्हा कोणी पुढे जाऊन सत्य दाखवतो, तेव्हा आपल्याला धक्काच बसतो. ‘द केरळ स्टोरी’च्या जबरदस्त यशावर बॉलिवूडचं मृत्यूसारखं मौन सर्वकाही स्पष्ट करतोय.’

हे सुद्धा वाचा

राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या दुसऱ्या ट्विटमध्ये लिहिलं, ‘द केरळ स्टोरी हा चित्रपट एका सुंदर आणि तितक्याच भितीदायक आरशाप्रमाणे आहे, जो मुख्य प्रवाहातील बॉलिवूडच्या मृत चेहऱ्याला त्याच्या सर्व कुरुपतेसह दाखवतोय. हा चित्रपट बॉलिवूडमधील प्रत्येक कॉर्पोरेट हाऊस आणि प्रत्येक स्टोरी डिस्कशन रुममध्ये एका गूढ धुक्याप्रमाणे घाबरवेल.’

इतकंच नव्हे तर त्यांनी आणखी एका ट्विटमध्ये लिहिलं, ‘द केरळ स्टोरी या चित्रपटापासून शिकवण घेणं खूप कठीण आहे कारण खोट्याची नक्कल करणं सोपं असतं पण सत्याची नक्कल करणं खूप कठीण असतं.’

‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत असला तरी देशभरात त्यावरून अद्याप वाद सुरूच आहे. चित्रपटात सांगितलेला 32 हजार महिलांचा आकडा, धर्मांतर या सर्व मुद्द्यांवरून चित्रपटाच्या निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना घेरण्यात येतंय. यावर अखेर दिग्दर्शक सुदिप्तो सेन आणि निर्माते विपुल शाह यांनी मौन सोडलं आहे. ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट प्रचारकी असल्याच्या आरोपांना त्यांनी फेटाळलं आहे. चित्रपटाच्या टीमने मुंबईत पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी केरळमधल्या काही पीडित मुलींनाही मंचावर सर्वांसमोर आणलं होतं.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.