‘रामायण’ फेम दीपिका चिखलिया यांच्यावर दुःखाचा डोंगर, म्हणाल्या, ‘आता घरी परतणं पूर्वीसारखं नसेल’

Dipika Chikhlia : 'रामायण' फेम दीपिका चिखलिया याच्या जवळच्या सदस्याचं निधन... कुटुंबावर दुःखाचा डोंगर, 'तो' फोटो पोस्ट करत म्हणाल्या, 'आता घरी परतणं पूर्वीसारखं नसेल', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या पोस्टची चर्चा..

'रामायण' फेम दीपिका चिखलिया यांच्यावर दुःखाचा डोंगर, म्हणाल्या, 'आता घरी परतणं पूर्वीसारखं नसेल'
Follow us
| Updated on: Feb 10, 2024 | 12:08 PM

मुंबई | 10 फेब्रुवारी 2024 : ‘रामायण’ मालिकेत माता सीता यांची भूमिका साकारत चाहत्यांच्या भेटीस आलेल्या अभिनेत्री दीपिका चिखलिया यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दीपिका यांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत दुःख व्यक्त केलं आहे. दीपिका चिखलिया यांच्या पाळीव कुत्र्याचं निधन झालं आहे. पाळीव कुत्र्याच्या निधनानंतर दीपिका यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दुःख व्यक्त केलं आहे. 13 वर्ष सोबत राहिल्यानंतर त्यांच्या पाळीव कुत्रा अभिनेत्री आणि कुटुंबाला कायमसाठी सोडून गेला आहे. सध्या सर्वत्र दीपिका चिखलियाा यांची सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होत आहे.

दीपिका यांनी पाळीव कुत्र्याचा फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये, ‘आमचा गोल्डन बॉय तुझ्यासोबत असलेल्या आठवणी कधीच विसरता येणार नाहीत. 13 वर्ष तू फक्त आम्हाला आनंद दिला. तो आमच्या आयुष्यातील प्रकाश होता. जमीनीवर को एका एन्जलप्रमाणे होता. आता तू खरंच एन्जल झाला आहेस. तुझ्या आत्म्याला शांती मिळो.’ दीपिका चिखलिया यांच्या पाळीव कुत्र्याचं नाव व्हीस्कू असं होतं.. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दीपिका चिखलिया यांच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

हे सुद्धा वाचा

दीपिका चिखलिया यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘रामायण’ मालिकेमुळे त्यांच्या चाहत्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली. आजही त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकताच अयोध्या याठिकाणी झालेल्या प्रभू राम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात दीपिका यांनी हजेरी लावली होती.

अयोध्या याठिकाणी दाखल झाल्यानंतर दीपिका यांचं मोठ्या थाटात आणि उत्साहा स्वागत करण्यात आलं. सोशल मीडियावर दीपिका यांचे फोटो आणि व्हिडीओ देखील तुफान व्हायरल झाले होते. खुद्द दीपिका यांनी देखील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले होते.

सांगायचं झालं तर, दीपिका चिखलिया आता अभिनय क्षेत्रात सक्रिय नसल्या तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी दीपिका कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.