AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘रामायण’ फेम दीपिका चिखलिया यांच्या मुलींचं सौंदर्य हैराण करणारं, फोटो पाहून तुम्ही म्हणाल…

Dipika Chikhlia : प्रचंड सुंदर आहेत 'रामायण' फेम दीपिका चिखलिया यांच्या मुलीं; अभिनय नाही तर, करतात 'असं' काम... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दीपिका चिखलिया यांच्या मुलींची आणि त्यांच्या सौंदर्याचीच चर्चा

'रामायण' फेम दीपिका चिखलिया यांच्या मुलींचं सौंदर्य हैराण करणारं, फोटो पाहून तुम्ही म्हणाल...
| Updated on: Dec 12, 2023 | 2:44 PM
Share

मुंबई| 12 डिसेंबर 2023 : ‘रामायण’ अभिनेत्री फेम दीपिका चिखलिया कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. आता देखील दीपिका चिखलिया चर्चेत आल्या आहे. दीपिका आता त्यांच्या खासगी किंवा प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, मुलींमुळे चर्चेत आल्या आहे. दीपिका कायम कुटुंबासोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतात. काही दिवसांपूर्वी दीपिका यांनी पतीसोबत रोमाँटिक व्हिडीओ पोस्ट केला होता ज्यामुळे त्यांना ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागला होता. दीपिका यांनी 1991 मध्ये गुजरात येथील उद्योजक हेमंत टोपीवाला यांसोबत लग्न केलं. दीपिका यांना दोन मुली देखील आहेत. मुलींच्या सौंदर्यापुढे दीपिका यांचं सौंदर्य फेल आहे. सध्या सोशल मीडियावर दीपिका यांचे त्यांच्या मुलींसोबत काही फोटो व्हायरल होत आहेत.

दीपिका चिखलिया यांच्या मुलींचं नाव जूही आणि निधी असं आहे. अभिनेत्रीच्या दोन्ही मुली अभिनयापासून दूर आहे. निधी प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी असूनही, तिने अभिनयाची निवड करिअर म्हणून केली नाही. निधी हिने मेकअप आर्टिस्ट म्हणून स्वतःची ओळख तयार केली आहे. निधी हिचा चेहरा तिच्या आईसारखाच आहे.

निधी सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. ती तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिच्या मेकअपचे व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करत असते. सोशल मीडियावर निधी हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहते निधी हिच्या प्रत्येक फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

दीपिका यांची लेक निधी हिच्याबद्दल अनेक गोष्टी माहिती आहेत, पण जूही हिच्याबद्दल फारसं काही माहिती नाही. पण दीपिका यांच्या दोन्ही मुली दिसायला आईप्रमाणे सुंदर आहेत. ‘रामायण’ मालिकेत ‘सीता’ या भूमिकेला न्याय दिल्यामुळे त्यांच्या चाहत्यांची संख्या आज देखील फार मोठी आहे. ‘रामायण’ मालिकेला संपून आज अनेक वर्ष झाली आहेत. पण कोणीही मालिका आणि दीपिका यांना विसरु शकलेलं नाही.

दीपिका चिखलिया यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, सोशल मीडियावर दीपिका चिखलिया कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी दीपिका चिखलिया कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतात. पण खासगी आयुष्यातील फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केल्यामुळे त्यांना ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.