श्रीलंकेहून परत येताच डेबिना बॅनर्जीला ‘या’ व्हायरसची लागण; मुलींपासून राहावं लागतंय दूर

व्हॅलेंटाइन डे आणि लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी डेबिना आणि गुरमीतने मुलींसोबत पहिली इंटरनॅशनल ट्रिप प्लॅन केली होती. मात्र या ट्रिपनंतर व्हायरसची लागण झाल्याने डेबिनाला तिच्या मुलींपासून दूर राहावं लागतंय.

श्रीलंकेहून परत येताच डेबिना बॅनर्जीला 'या' व्हायरसची लागण; मुलींपासून राहावं लागतंय दूर
Debina BonnerjeeImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 01, 2023 | 2:19 PM

मुंबई : रामायण या मालिकेतून घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री डेबिना बॅनर्जी नुकतीच श्रीलंकेच्या ट्रिपवरून परतली. आपल्या दोन चिमुकल्या मुली आणि पती गुरमीत चौधरीसोबत ती तिथे फिरायला गेली होती. मात्र तिथून परतल्यानंतर डेबिनाची तब्येत बिघडली आहे. तिला इन्फ्लुएंझा बी या व्हायरसची लागण जाली आहे. त्यामुळे तिला तिच्या मुलींपासून आणि इतर कुटुंबीयांपासून दूर राहावं लागतंय. डेबिनाचा पती गुरमीत आणि दिविशा-लियाना या दोन्ही मुली सुरक्षित आहेत. फक्त डेबिनालाच इन्फ्लुएंझा बी व्हायरसची लागण झाली आहे.

श्रीलंकेवरून परतल्यानंतर डेबिना आजारी पडली. सर्दी-ताप झाल्याने ती सर्वकाही काळजी घेत होती. मात्र तब्येतीत सुधारणा न झाल्याने अखेर तिने काही चाचण्या केल्या. त्यात तिला इन्फ्लुएंझा बी व्हायरसचं निदान झालं. ‘डेबिनाच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा होतेय. ती सर्व प्रकारची काळजी घेतेय आणि वेळोवेळी औषधं घेत आहे. त्याचप्रमाणे तिच्या मुलींना व्हायरसची लागण होऊ नये यासाठी ती त्यांच्यापासून दूर राहत आहे’, अशी माहिती डेबिनाच्या जवळच्या व्यक्तीने दिली.

डेबिना आणि गुरमीतने दोन्ही मुलींसोबत पहिली आंतरराष्ट्रीय ट्रिप प्लॅन केली होती. व्हॅलेंटाइन डे आणि लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दोघांनी श्रीलंकेच्या ट्रिपची प्लॅनिंग केली होती. ही ट्रिप दोघांनाही खूप चांगल्याप्रकारे लक्षात राहणार आहे. कारण या ट्रिपदरम्यान डेबिनासोबत बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत. तिची मुलगी लियाना विमानप्रवासादरम्यान सतत रडत होती. इतकंच नव्हे तर डेबिना तिचा मोबाइल फोनसुद्धा श्रीलंकेच्या हॉटेलमध्ये विसरून आली होती. सुदैवाने नंतर तिला तिचा फोन मिळाला.

हे सुद्धा वाचा

डेबिना आणि टीव्ही अभिनेता गुरमीत चौधरी यांनी 15 फेब्रुवारी 2011 रोजी लग्न केलं होतं. लग्नाच्या 11 वर्षांनंतर डेबिना पहिल्यांदा गरोदर झाली. 3 एप्रिल 2022 रोजी डेबिनाने गोंडस मुलीला जन्म दिला. तिचं नाव लियाना असं आहे.

पहिल्या मुलीच्या जन्मानंतर अवघ्या दोन महिन्यांत पुन्हा डेबिना गरोदर होती. 11 नोव्हेंबर रोजी तिने दुसऱ्या बाळाला जन्म दिला. 2008 मध्ये ‘रामायण’ या मालिकेच्या सेटवर डेबिना आणि गुरमीतची पहिल्यांदा भेट झाली होती. या मालिकेत गुरमीतने राम तर डेबिनाने सीतेची भूमिका साकारली होती. डेबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी हे टीव्हीवरील सर्वांत लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.