‘रामायण’चे राम आणि लक्ष्मण फेक अकाउंटने त्रस्त, म्हणाले…
'रामायण' मालिकेत रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल (Fake accounts on social media) आणि लक्ष्मणची भूमिका साकारणारे सुनील लहरी सध्या सोशल मीडियावरील फेक अकाउंटमुळे त्रस्त झाले आहेत.
मुंबई : ‘रामायण’ मालिकेत रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल (Fake accounts on social media) आणि लक्ष्मणची भूमिका साकारणारे सुनील लहरी सध्या सोशल मीडियावरील फेक अकाउंटमुळे त्रस्त झाले आहेत. ‘दूरदर्शन’वर ‘रामायण’ मालिका सुरु झाल्यापासून सोशल मीडियावर त्यांच्या नावाचे अनेक फेक अकाउंट असल्याचं समोर आलं आहे. याबाबत दोघांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर स्पष्टीकरण दिलं आहे (Fake accounts on social media).
अरुण गोविल यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करुन याबाबत खुलासा केला आहे. “ट्विटरवर कुणीतरी ‘रिअल अरुन गोविल’ नावानं अकाउंट बनवलं आहे. मात्र, ते खोटं आहे”, असं अरुन गोविल यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर सुनील लहरी यांनीदेखील ट्विट करत माहिती दिली.
नमस्कार भाइयों एवं बहनो, एक आवश्यक सूचना आपको इस विडीओ के माध्यम से देना चाहता हूँ । आशा करताहूँ आप अवश्य समर्थन करेंगे !@realarungovil से विनती करें कि वो ऐसा ना करें ! pic.twitter.com/k7k9j8eWvi
— Arun Govil (@arungovil12) April 6, 2020
“कुठल्यातरी चुकीच्या आणि खोट्या ट्विटर अकाउंटर माझे 3 ते 4 वर्षांपूर्वीचे फोटो शेअर केले जात आहेत. माझ्या नावाने अनेक खोटे ट्विटर आणि फेसबुक अकाउंट सुरु आहेत”, असं सुनील लहरी यांनी स्पष्ट केलं आहे.
किसी गलत आईडी से पोस्ट कि जा रही है हमारी 3-4 साल पुरानी फोटो .. मेरे कई गलत आईडी/fake ID बने है मेरा एक ही ट्वीटर आइडी है @LahriSunil धयान रखे We notice some people created fake n false Twitter ID Evan false Facebook account my only Twitter id which I operate is @ LahriSunil ?? pic.twitter.com/ntDpGmYaa8
— Sunil lahri (@LahriSunil) April 7, 2020
कोरोना विषाणूंपासून देशाला वाचवण्यासाठी सरकारने देशभरात मार्च ते 14 एप्रिलपर्यंत 21 दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली. मात्र इतके दिवस घरात राहून वेळ घालवणे कठीण होतं. त्यामुळे लॉकडाऊनला यशस्वी बनवण्यासाठी सरकारने लोकांच्या आग्रहास्तव ‘रामायण’ ही मालिका पुन्हा दाखवण्यास सुरुवात केली. दिवसाला दोन वेळा ‘दूरदर्शन’ या चॅनेलवर ही मालिका दाखवली जाते.
या लॉकडाऊनच्या काळात नागरिकांच्या आग्रहास्तव ही ‘रामायण’ मालिका पुन्हा सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतला. ही मालिका सुरु झाल्यापासून पुन्हा एकदा या मालिकेने दाखवून दिले आहे ही आजही ही मालिका टीआरपीच्या बाबतीत सर्वोकृष्ट आहे. आजही या मालिकेच्या तोडीस दपसरी कुठलीही मालिका नाही. इतकंच नाही तर 2015 पासून ते आतापर्यंतच्या मनोरंजक मालिकांमध्ये ही मालिका टॉपवर आहे.
सोशल मीडियावर ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या मालिका पुन्हा प्रसारित कराव्या, अशी मागणी जोर धरु लागली होती. त्यानंतर या मालिका टीव्हीवर पुन्हा एकदा प्रसारित करण्यात आल्या. या मालिका बघून लोकांनी त्यांचे अनुभव सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
संबंधित बातमी : Ramayan : रामायण मालिकेने टीआरपीचं गणित बदललं, पुन्हा एकदा इतिहास रचला