Adipurush | ‘नंतर मला शिव्या ऐकायच्या नव्हत्या…’, सिनेमात नसतानाही प्रसिद्ध अभिनेता असं का म्हणाला?

'आदिपुरुष' सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्याला सतत येत आहेत अनेकांचे फोन.. सिनेमात भूमिका नसतानाही फक्त एका कराणामुळे अभिनेता चर्चेत.. नक्की काय आहे प्रकरण...

Adipurush | 'नंतर मला शिव्या ऐकायच्या नव्हत्या...', सिनेमात नसतानाही प्रसिद्ध अभिनेता असं का म्हणाला?
Follow us
| Updated on: Jun 19, 2023 | 9:59 AM

मुंबई | ‘आदिपुरुष’ सिनेमाबद्दल निर्माण झालेला वाद आता टोकाला पोहोचला आहे. अनेक ठिकाणी सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. ज्यामुळे सिनेमाच्या टीमला मोठा धक्का बसला आहे. उद्भवलेल्या वादानंतर सिनेमात बदल करणार असल्याची घोषणा दिग्दर्शकाने केली आहे. सध्या सर्वत्र सिनेमाची चर्चा आहे. ‘आदिपुरुष’ सिनेमा रामायणावर आधारलेला असल्यामुळे रामानंद सागर याच्या ‘रामायण’ मालिकेतील कलाकार देखील चर्चेत आले आहे. ‘रामायण’ मालिकेत हनुमान यांची भूमिका साकारणारे अभिनेते दारा सिंग यांचे पूत्र विंदू दारा सिंग यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ज्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे.

विंदू दारा सिंग म्हणाले, ‘सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर मला सतत फोन येत आहेत. प्रत्येक जण मला विचात होते की, तुम्ही सिनेमात हनुमानाची भूमिका का साकारली नाही. शिवाय सिंग म्हणाले, तुम्ही रामायणाला गालबोट लावू शकत नाहीत. रामायण अतिशय संवेदनशील विषय असून तो सर्वांच्या जवळचा विषय आहे..’ (vindoo dara singh)

सध्या सिनेमाबद्दल अनेक वाद सुरु आहेत, सिनेमात हनुमान यांची भूमिका साकारण्यासाठी विंदू दारा सिंग यांना विचारण्यात आलं असतं तरी, त्यांनी सिनेमात भूमिका साकारण्यास नकार दिला असता. यावर सिंग म्हणाले ‘रामायणाबबतीत काहीही करण्याआधी मी अनेकदा विचार करेल.. नंतर मला शिव्या ऐकाव्या लागतील असं मी काहीही करणार नाही…’

पुढे विंदू दारा सिंग म्हणाले, ‘मी सिनेमात काम कधीच केलं नसतं. सिनेमात हनुमान कपडे, डायलॉग.. इत्यादी गोष्टींच्या चर्चा रंगत आहेत. जर तुम्ही रामायणावर काम करत आहात तर तुम्हाला सावध राहण्याची अत्यंत गरज आहे. रामायणाला गालबोट लावणं अत्यंत भयानक आहे…’ असं देखील विंदू दारा सिंग म्हणाले… सध्या सर्वत्र ‘आदिपुरुष’ आणि विंदू दारा सिंग यांच्या वक्तव्याची चर्चा रंगत आहे.

अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री क्रिती सनॉन स्टारर ‘आदिपुरुष’ सिनेमा प्रदर्शनानंतर वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सध्या सर्वत्र आदिपुरुष सिनेमाची चर्चा रंगली आहे. सिनेमा पाहिल्यानंतर प्रेक्षक देखील नाराजी जाहिर करत आहेत. तर सिनेमातील डायलॉगवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

सध्या सिनेमा सर्वच स्तारातून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. शिवाय अनेक ठिकाणी सिनेमा बॅन करण्याची देखील मागणी होत आहे… त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता ‘आदिपुरुष’ सिनेमा किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे…

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.