AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Seema Deo | ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं निधन; अजिंक्य देवला मातृशोक

राजा परांजपे दिग्दर्शित 'जगाच्या पाठीवर' (1961) या चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. 'सुवासिनी', 'आनंद' अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांची दाद मिळवली.

Seema Deo | ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं निधन; अजिंक्य देवला मातृशोक
Seema DeoImage Credit source: Facebook
| Updated on: Aug 24, 2023 | 1:51 PM
Share

मुंबई | 24 ऑगस्ट 2023 : मराठी आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं दीर्घ आराजाने निधन झालं आहे. त्या 81 वर्षांच्या होत्या. गेल्या काही काळापासून त्यांना अल्जायमर होता. 2020 मध्ये त्यांचा मुलगा आणि अभिनेता अजिंक्य देवने सोशल मीडियावर याबद्दलची माहिती दिली होती. तर गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये रमेश देव यांचं निधन झालं होतं. हृदयविकाराच्या झटक्यानंतर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. सीमा देव यांच्या निधनानंतर मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. राजा परांजपे दिग्दर्शित ‘जगाच्या पाठीवर’ (1961) या चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. ‘सुवासिनी’, ‘आनंद’ अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांची दाद मिळवली. सीमा देव यांच्या पार्थिवावर आज (गुरुवार) संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास शिवाजी पार्क इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.

सीमा देव- रमेश देव यांची जोडी

रमेश देव आणि सीम देव यांनी मराठी चित्रपटांपेक्षा अधिक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. केवळ अभिनयानेच नाही तर आपल्या प्रेमकहाणीनेही त्यांनी चाहत्यांच्या मनात स्थान मिळवलं. सीमा देव यांचं मूळ नाव नलिनी सराफ आहे. त्यांच्या पहिल्यावहिल्या चित्रपटात रमेश देव यांनीदेखील भूमिका साकारली होती. या पहिल्याच चित्रपटापासून ही जोडी सुपरहिट ठरली होती. त्यानंतर दोघांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. प्रेक्षकांना या दोघांची जोडी खूप आवडली. सीमा देव यांनी ‘सरस्वतीचंद्र’, ‘ड्रीम गर्ल’, ‘आनंद’, ‘कोशिश’ यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या.

कलाविश्वावर शोककळा

1962 मध्ये ‘वरदक्षिणा’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघं एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते आणि त्याच वर्षी दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सीमा आणि रमेश देव यांना अजिंक्य देव आणि अभिनय देव ही दोन मुलं आहेत. त्यापैकी अजिंक्यनेही आईवडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. तर अभिनय हा दिग्दर्शन आणि पटकथा लेखन क्षेत्रात कार्यरत आहे.

सीम देव यांच्या निधनावर अभिनेते सचिन पिळगावकर यांनी शोक व्यक्त केला. “माझ्या पहिल्या चित्रपटात त्यांनी पडद्यावर माझ्या आईची भूमिका साकारली होती. त्यामुळे स्क्रीनवर मला भेटलेल्या त्या पहिल्या आई आहेत”, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.