केकवर दारू ओतून आग लावताना ‘जय माता दी’ बोलणं रणबीर कपूरला पडलं महागात

दरवर्षी ख्रिसमसनिमित्त कपूर कुटुंबीय एकत्र येऊन लंच करतात. ही परंपरा त्यांनी यावर्षीही कायम राखली. ख्रिसमसनिमित्त कपूर कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र आले. मात्र या पार्टीतील एक व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांच्या पसंतीस पडला नाही. यामध्ये रणबीर हा वाईन ओतलेल्या केकला आग लावताना दिसत आहे. असं करताना तो 'जय माता दी' म्हणतोय.

केकवर दारू ओतून आग लावताना 'जय माता दी' बोलणं रणबीर कपूरला पडलं महागात
Ranbir KapoorImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 28, 2023 | 8:13 AM

मुंबई : 28 डिसेंबर 2023 | दरवर्षी ख्रिसमसनिमित्त बॉलिवूडमधील कपूर कुटुंबीय एकत्र येतात आणि एकमेकांसोबत वेळ घालवतात. ही परंपरा त्यांनी यावर्षीही कायम ठेवली. करिश्मा कपूर, करीना कपूर यांच्यासोबतच रणबीर कपूर आणि त्याची पत्नी आलिया भट्ट ख्रिसमस पार्टीसाठी एकत्र आले. मात्र या पार्टीतील एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. ज्यामध्ये रणबीर कपूर हा केकला आग लावताना दिसत आहे. त्यापूर्वी त्या केकवर एकाने वाइन ओतलं आणि नंतर रणबीरने त्याला आग लागली. असं करताना रणबीर ‘जय माता दी’ बोलताना या व्हिडीओत दिसतोय. यावरूनच अनेकांनी आक्षेप घेतला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत असून त्यावर नेटकरी भडकले आहेत. आता हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं आहे. कारण बुधवारी एका व्यक्तीने रणबीर आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात थेट पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, वकील आशिष राय आणि पंकज मिश्रा यांच्या माध्यमातून संजय तिवारी नावाच्या व्यक्तीने घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. व्हिडीओमध्ये रणबीर ‘जय माता दी’ बोलून केकवर वाइन ओतताना आणि त्याला आग लावताना दिसतोय. यामुळे हिंदू धर्माच्या देवतांचा अपमान झाल्याची तक्रार संबंधित व्यक्तीने केली आहे. रणबीरच्या या कृत्यामुळे हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या गेल्याचं त्याने म्हटलंय. या तक्रारीनंतर रणबीर किंवा त्याच्या कुटुंबीयांविरोधात कोणताही एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

ख्रिसमसनिमित्त एकत्र लंच करण्यासाठी कपूर कुटुंबातील सर्व सदस्य हे शशी कपूर यांच्या घरी पोहोचले होते. या पार्टीला जाण्यापूर्वी आलिया भट्ट आणि रणबीर कपूरने त्यांची मुलगी राहा कपूरचा चेहरा पहिल्यांदाच माध्यमांना दाखवला. रणबीर-आलियाची मुलगी राहा आता एक वर्षाची झाली आहे. तिच्या जन्मानंतर आलिया आणि रणबीरने तिचा चेहरा कोणालाच न दाखवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता वर्षभरानंतर त्यांनी स्वत:हून राहाला पापाराझी आणि फोटोग्राफर्ससमोर आणलं.

कपूर कुटुंबीयांच्या ख्रिसमस लंच पार्टीमध्ये करिश्मा कपूर आणि तिची दोन मुलं समायरा-कियान, करिश्मा-करीनाचे आईवडील बबीता कपूर आणि रणधीर कपूर, शशी कपूर यांचा मुलगा कुणाल कपूर यांच्यासोबत रणबीरची काकी रिमा जैन हेसुद्धा सहभागी झाले होते. अरमान जैन आणि आदर जैन हे दोघंसुद्धा त्यांच्या पार्टनरसोबत पार्टीला उपस्थित होते. याशिवाय बच्चन कुटुंबातील अगस्त्य नंदा आणि नव्या नवेली नंदासुद्धा कपूर कुटुंबातील पार्टीला उपस्थित होते.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.