डोळे तर हुबेहूब ऋषी कपूर यांच्यासारखेच.. रणबीर-आलियाच्या लेकीचे फोटो पाहिलेत का?

राहाच्या जन्मापासूनच रणबीर आणि आलियाने तिच्या फोटोंबद्दल महत्त्वाचा निर्णय घेतला होता. तिचे फोटो कुठेच पोस्ट करायचे नाहीत किंवा पापाराझींना क्लिक करू द्यायचे नाहीत, असा त्यांचा आग्रह होता. मात्र आता ख्रिसमसनिमित्त त्यांनी राहाला सर्वांसमोर आणलं आहे.

डोळे तर हुबेहूब ऋषी कपूर यांच्यासारखेच.. रणबीर-आलियाच्या लेकीचे फोटो पाहिलेत का?
Ranbir Kapoor with daughter Raha KapoorImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 25, 2023 | 3:10 PM

मुंबई : 25 डिसेंबर 2023 | अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्टने अखेर त्यांची मुलगी राहाचा चेहरा सर्वांना दाखवला आहे. दरवर्षी ख्रिसमसनिमित्त कपूर कुटुंबीय एकत्र येतात. लंचच्या आधी रणबीर आणि आलिया राहाला घेऊन पापाराझींसमोर आले. सध्या सोशल मीडियावर राहाचेच फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यावर नेटकऱ्यांकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होतोय. राहाचे डोळे हुबेहूब रणबीरचे आजोबा ऋषी कपूर यांच्यासारखेच असल्याचं नेटकरी म्हणत आहेत. यावेळी तिने गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. त्यावर लाल रंगाचे वेल्वेचे शूज घातले होते.

जवळपास वर्षभरानंतर राहाचा चेहरा पहायला मिळाल्याने नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ‘राहाचे डोळे हुबेहूब ऋषी कपूर यांच्यासारखेच आहेत’, असं एकाने लिहिलं. तर ‘राहा ही आजोबा ऋषी कपूर यांच्यावरच गेली आहे’, असं दुसऱ्याने म्हटलंय. राहाचा जन्म 6 नोव्हेंबर 2022 रोजी झाला. आतापर्यंत रणबीर आणि आलियाने राहाचे कोणतेच फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले नव्हते. त्याचसोबत त्यांनी पापाराझींनाही तिचे फोटो क्लिक न करण्याची विनंती केली होती. अखेर ख्रिसमसनिमित्त तिला सर्वांसमोर आणून रणबीर-आलियाने चाहत्यांना गोड सरप्राइज दिला आहे.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या दोन महिन्यांनंतर जूनमध्ये आलियाने गरोदर असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर 6 नोव्हेंबर 2022 रोजी तिने मुलगी राहा कपूरला जन्म दिला. मुलीचा चेहरा सर्वांसमोर न आणण्याविषयी आलिया एका मुलाखतीत म्हणाली होती, “माझ्या मुलीबद्दल कोणतीच गोष्ट बोलण्यासाठी मी सध्या कम्फर्टेबल नाही. अनेकांकडून मला शुभेच्छा आणि आशीर्वाद मिळत आहेत. मला राहाची आई अशी हाक मारली जात आहे, जे मला खूपच क्युट वाटतं. पण ज्यांच्यावर मी प्रेम करते, त्यांच्याबाबत मी फार प्रोटेक्टिव्ह आहे. मला खरंच असं वाटतं की बाळाने पब्लिक पर्सनॅलिटी व्हायची काही गरज नाही. हे माझं वैयक्तिक मत आहे.”

दुसरीकडे रणबीर मुलीविषयी बोलताना एका मुलाखतात म्हणाला, “पालक म्हणून आम्ही राहाच्या प्रायव्हसीला शक्य तितकं जपण्याचा प्रयत्न करतोय. एका सामान्य मुलीप्रमाणे ती लहानाची मोठी व्हावी, अशी आमची इच्छा आहे. सामान्य मुलींप्रमाणेच तिने शाळेत जावं. इतर मुलामुलींमध्ये तिने स्वत:ला वेगळं समजू नये, असं आमचं मत आहे.”

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.