Ranbir Kapoor | लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान रणबीरने आलियासाठी केली अशी गोष्ट, जे पाहून चाहतेही पडले प्रेमात!

रणबीरने अत्यंत खास अंदाजात पत्नी आणि अभिनेत्री आलिया भट्टसाठीचं प्रेम व्यक्त केलं. दिल्लीतल्या एका लाइव्ह कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करताना रणबीरने आलिया आणि मुलगी राहा कपूरला व्हॅलेंटाइन डेच्या शुभेच्छा दिल्या.

Ranbir Kapoor | लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान रणबीरने आलियासाठी केली अशी गोष्ट, जे पाहून चाहतेही पडले प्रेमात!
Ranbir Kapoor and Alia BhattImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 15, 2023 | 10:39 AM

दिल्ली: व्हॅलेंटाइन डेनिमित्त बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांनी त्यांच्या प्रिय व्यक्तीबद्दल जाहीर प्रेम व्यक्त केलं. सोशल मीडियावर आपल्या पार्टनरसोबतचा फोटो पोस्ट करत सेलिब्रिटींनी व्हॅलेंटाइन डेच्या शुभेच्छा दिल्या. मात्र या सर्वांत अभिनेता रणबीर कपूरच्या एका व्हिडीओने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. रणबीरने अत्यंत खास अंदाजात पत्नी आणि अभिनेत्री आलिया भट्टसाठीचं प्रेम व्यक्त केलं. दिल्लीतल्या एका लाइव्ह कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करताना रणबीरने आलिया आणि मुलगी राहा कपूरला व्हॅलेंटाइन डेच्या शुभेच्छा दिल्या. त्याच्या या खास अंदाजाची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

रणबीर सध्या त्याच्या आगामी ‘तू झूठी मै मक्कार’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. व्हॅलेंटाइन डेनिमित्त तो गुडगाव इथल्या एका मोठा कार्यक्रमात सहभागी झाला होता. यादरम्यान त्याने स्टेजवर लाइव्ह कॉन्सर्टमध्ये पत्नी आलिया आणि मुलगी राहाचा उल्लेख केला. “तुम्हा सर्वांना व्हॅलेंटाइन डेच्या शुभेच्छा. सर्वांत आधी मी माझ्या आयुष्यातील दोन प्रेमळ व्यक्तींना.. म्हणजेच माझी पत्नी आलिया आणि माझी सुंदर मुलगी राहा यांना व्हॅलेंटाइन डेच्या शुभेच्छा देऊ इच्छितो. आय लव्ह यू गर्ल्स अँड आय मिस यू”, अशा शब्दांत त्याने प्रेम व्यक्त केलं.

हे सुद्धा वाचा

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये लग्नगाठ बांधली. लग्नाच्या दोन महिन्यांनंतर जूनमध्ये आलियाने गरोदर असल्याचं जाहीर केलं. नोव्हेंबर 2022 मध्ये तिने मुलगी राहा कपूरला जन्म दिला. 6 फेब्रुवारी 2023 रोजी रणबीर-आलियाची मुलगी तीन महिन्यांची झाली. आतापर्यंत त्यांनी राहाचा चेहरा चाहत्यांना दाखवलेला नाही.

राहाच्या जन्मानंतर दिलेल्या पहिल्या मुलाखतीत आलिया मातृत्वाबद्दल व्यक्त झाली होती. “अवघ्या काही दिवसांत मातृत्वाच्या भावनेनं माझ्यात खूप काही बदल आणले आहेत,” असं ती म्हणाली होती. आई झाल्यानंतर चित्रपटांच्या निवडीवर काही परिणाम होईल का, असाही प्रश्न तिला या मुलाखतीत विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना ती पुढे म्हणाली, “ही गोष्ट माझ्या दृष्टीकोनालाही बदलणारी आहे. पहिल्यापेक्षा आता माझं मन खूप मोकळं झालंय असं मला वाटतं. मला माहीत नाही की काय बदल होतील, पण पुढे काय होईल हे पहायला मला आवडेल. या प्रवासासाठी मी खूपच उत्सुक आहे.”

रणबीर लवकरच ‘तू झूठी मै मक्कार’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री श्रद्धा कपूर मुख्य भूमिका साकारणार आहे.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.