रणबीर कपूरने उडवली आलियाची खिल्ली; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, ‘बायकोला जरा घाबर’!

रणबीर – श्रद्धाच्या ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटाने 80 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. आठव्या दिवशीही चित्रपटाची समाधानकारक कमाई झाली. बुधवारी या चित्रपटाने पाच कोटी रुपयांपेक्षा अधिक गल्ला जमवला आहे.

रणबीर कपूरने उडवली आलियाची खिल्ली; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, 'बायकोला जरा घाबर'!
Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 17, 2023 | 1:40 PM

मुंबई : अभिनेता रणबीर कपूरच्या ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटात त्याने श्रद्धा कपूरसोबत पहिल्यांदाच काम केलं आहे. ही फ्रेश जोडी प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरली आहे. रणबीरचं कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म अकाऊंट नाही. मात्र नुकत्याच एका मजेशीर व्हिडीओमध्ये त्याने व्हायरल झालेल्या या भन्नाट मीम्सला रिक्रिएट केलं आहे. रजनीकांत, नाना पाटेकर यांच्या मीम्सची नक्कल करतानाच त्याने पत्नी आलिया भट्टच्याही एका गाजलेल्या मीमची नक्कल केली. हे पाहून नेटकऱ्यांना हसू अनावर झालं. पत्नीचंच मीम रिक्रिएट केल्यानंतर चाहत्यांनीही त्यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटाच्या एका प्रमोशनल व्हिडीओमध्ये रणबीरने मीम्सची नक्कल केली आहे. “तू झूठी मैं मक्कार या माझ्या चित्रपटात मी जितका मोठा रिलेशनशिप एक्स्पर्ट आहे, त्याहून मोठा मी मीम एक्स्पर्ट आहे”, असं तो या व्हिडीओच्या सुरुवातीला म्हणतो. त्यानंतर तो एकानंतर एका मीमची नक्कल करू लागतो. रजनीकांत, मिस्टर रोबोटचा हॅकरमॅन, नाना पाटेकर यांच्या मीम्सनंतर तो स्वत:वरील काही मीम्सचीही नक्कल करून दाखवतो. मात्र या व्हिडीओच्या शेवटचा क्लिप पाहून नेटकऱ्यांना हसू अनावर झालं.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by JioSaavn (@jiosaavn)

आलियाच्या ‘राजी’ या चित्रपटातील ‘मुझे घर जाना है’ या संवादानुसार आजवर तुफान मीम्स व्हायरल झाले. हाच सीन रणबीरने रिक्रिएट केला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘बायकोला जरा घाबर’, असं एकाने म्हटलंय. तर ‘शेवटचा मीम जबरदस्त होता’, असं काहींनी लिहिलंय.

रणबीर – श्रद्धाच्या ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटाने 80 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. आठव्या दिवशीही चित्रपटाची समाधानकारक कमाई झाली. बुधवारी या चित्रपटाने पाच कोटी रुपयांपेक्षा अधिक गल्ला जमवला आहे. वीकेंडलाही कमाईचा आकडा चांगला होता. त्यामुळे लव रंजन दिग्दर्शित हा चित्रपट लवकरच 100 कोटी क्लबमध्ये पोहोचणार असल्याचा अंदाज आहे.

‘तू झूठी मैं मक्कार’ची आतापर्यंतची कमाई

बुधवार- 15.73 कोटी रुपये गुरुवार- 10.34 कोटी रुपये शुक्रवार- 10.52 कोटी रुपये शनिवार- 16.57 कोटी रुपये रविवार 17.08 कोटी रुपये सोमवार 6.05 कोटी रुपये मंगळवार- 6.02 कोटी रुपये बुधवार- 5.60* कोटी रुपये एकूण – 87.91* कोटी रुपये

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.