Ranbir Kapoor | आलिया भट्टच्या लिपस्टिक विधानावर अखेर रणबीर कपूर याचा मोठा खुलासा, अभिनेत्याने थेट म्हटले…
बाॅलिवूड अभिनेता रणबीर कपूर याला ईडीने समन्स पाठवल्यानंतर त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. इतकेच नाही तर यानंतर अनेकांनी थेट रणबीर कपूर याला टार्गेट करण्यास सुरूवात केली. रणबीर कपूर मोठा वादात सापडला.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. रणबीर कपूर याच्यावर अत्यंत गंभीर आरोप हे करण्यात आले. इतकेच नाही तर काही दिवसांपूर्वीच रणबीर कपूर याला ईडीने (ED) थेट समन्स पाठवलाय. रणबीर कपूर याचे नाव महादेव अॅप प्रकरणात आल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला. या प्रकरणात रणबीर कपूर याने मोठे पैसे घेतल्याचे सांगितले जातंय. फक्त रणबीर कपूर हाच नाही तर यामध्ये अनेक बाॅलिवूड कलाकारांची नावे देखील पुढे आलीत.
रणबीर कपूर हा सध्या त्याच्या आगामी अॅनिमल या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत दिसतोय. या चित्रपटाचे प्रमोशन करताना देखील रणबीर कपूर हा दिसत आहे. नुकताच रणबीर कपूर याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये रणबीर कपूर हा काही मोठे खुलासे करताना दिसतोय.
या व्हिडीओमध्ये रणबीर कपूर हा एकटाच दिसत आहे. रणबीर कपूर हा चाहत्यांना बोलताना दिसतोय. रणबीर कपूर म्हणतो की, मी सोशल मीडियावर नाही त्यामुळे मला नकारात्मक गोष्टींना फार जास्त सामोरे जावे लागत नाही. विशेष म्हणजे खरोखरच ही खूप जास्त चांगली गोष्ट नक्कीच आहे. परंतू मला वाटते की, कधी कधी नकारात्मकता देखील आवश्यक आहे.
ज्यावेळी तुम्ही एक अभिनेते असता त्यावेळी दोन्ही गोष्टी असणे आवश्यक नक्कीच असते. यामुळे आपल्याला आयुष्यामध्ये संतुलन राखण्यास मदत नक्कीच होते. पुढे रणबीर म्हणाला, एक अभिनेता असल्याने माझ्याबद्दल अनेक गोष्टी या लिहिल्या जातात. परंतू लिहिलेली प्रत्येक गोष्टच खरी असते असेही अजिबातच नसते.
i am on the side of the people who are fighting for the toxic masculinity, if they use me as the face of it, it’s fine because their fight is bigger than just me feeling bad about them having an opinion about what i said What a man you’re #RanbirKapoor pic.twitter.com/Gs3lOiDV6x
— 𝙑amsi ♪ (@RKs_Tilllast) October 24, 2023
माझी एक प्रतिमा मीडियाकडून बनवली गेलीये. ती प्रतिमा मी चित्रपटांमध्ये साकारलेल्या पात्रांच्या आधारे तयार करण्यात आलीये. मी काही लोकांना आवडतो तर काहींना नाही आवडत, हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. मी फक्त माझ्या कामावर लक्ष केंद्रित करतो.
लिपस्टिकवाल्या प्रकरणाबद्दल बोलताना देखील रणबीर कपूर हा दिसतोय. रणबीर म्हणाला, मी काही दिवसांपूर्वीच माझ्याबद्दल लिहिलेला लेख वाचला. ज्यामध्ये माझ्याबद्दल केलेल्या विधानामुळे मला थेट विषारी असा टॅग देण्यात आला आहे. पुढे मोठे खुलासे करताना रणबीर कपूर हा दिसलाय. रणबीर कपूर याचा आता हाच व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय.