रणबीर कपूरने घेतला विकी कौशलसोबत कतरिनाच्या लग्नाचा बदला; सेटवर ‘हे’ म्हणत उडवली खिल्ली

रणबीरने विकी कौशलकडून घेतला कतरिनाचा बदला? व्हिडीओवर भन्नाट कमेंट्स

रणबीर कपूरने घेतला विकी कौशलसोबत कतरिनाच्या लग्नाचा बदला; सेटवर 'हे' म्हणत उडवली खिल्ली
रणबीर कपूरने घेतला विकी कौशलसोबत लग्नाचा बदलाImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 21, 2022 | 12:33 PM

मुंबई: अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या लग्नाने अनेक चाहत्यांचा हृदयभंग झाला. या यादीत सर्वसामान्य चाहत्यांपासून ते अगदी एक्स बॉयफ्रेंड सलमान खान आणि रणबीर कपूर यांचाही सहभाग आहे. आता रणबीरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरय होतोय, ज्यामध्ये तो कतरिनाचा पती विकी कौशलची खिल्ली उडवताना दिसत आहे. रणबीर रॅगिंगच्या अंदाजात विकीशी बोलू लागतो. अशा वेळी विकीसुद्धा त्याची फिरती घेतो. रणबीरसमोर रणवीर सिंग माझा आवडता हिरो असल्याचं बोलतो. हे ऐकल्यानंतर रणबीर ज्याप्रकारे विकीची खिल्ली उडवतो, ते पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल.

हा व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणत आहेत की विकी आणि कतरिनाच्या लग्नामुळे रणबीर खूश नाही. त्यामुळेच तो सेटवर विकीचा बदला घेतोय. एका चित्रपटाच्या सेटवरील हा व्हिडीओ आहे, ज्यामध्ये रणबीर शॉटसाठी तयार होत असतो. मागे उभा असलेला विकी त्याला बघून म्हणतो, “मी रणबीर कपूर नाही तर रणवीर सिंगचा चाहता आहे.” त्यानंतर विकी आणि कियारा रणबीरला एक डान्स स्टेप करून दाखवतात. मात्र रणबीर त्यांना भावच देत नाही.

हे सुद्धा वाचा

रणबीर पुढे विकीला म्हणतो, “मी एका चित्रपटाची निर्मिती करतोय. दिग्दर्शकांना सांगेन की त्यांनी तुला कॉल करावं.” जेव्हा विकी विचारतो की चित्रपटात हिरो कोण असेल? तेव्हा रणबीर त्याची मस्करी करत म्हणतो, “रणवीर सिंग, तुझा आवडता”. त्यानंतर विकी म्हणतो की रणबीर कपूर त्याचा आवडता अभिनेता आहे, मात्र रणबीर हसत त्याला म्हणतो की खोटं नको बोलूस.

विकी कौशलच्या ‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटाच्या सेटवरील हा व्हिडीओ आहे. यामध्ये विकी कौशल, कियारा अडवाणी आणि भूमी पेडणेकर यांच्या मुख्य भूमिका आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.