रणबीरच्या फोन वॉलपेपरवर आलिया, राहा यांचा नाही, तर ‘या’ खास व्यक्तीचा फोटो

पत्नी आणि लेक यांच्यापेक्षा रणबीरचं 'या' व्यक्तीवर प्रचंड प्रेम; फोन वॉलपेपरवर असलेल्या फोटोमुळे सत्य समोर

रणबीरच्या  फोन वॉलपेपरवर आलिया, राहा यांचा नाही, तर 'या' खास व्यक्तीचा फोटो
Alia and RanbirImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 08, 2023 | 2:42 PM

मुंबई : अभिनेता रणबीर कपूरसाठी 2022 हे वर्ष अत्यंत खास होतं. कारण अनेक वर्षांनंतर अभिनेत्याचा ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. बॉक्स ऑफिसवर देखील सिनेमाने कोट्यवधींचा गल्ला जमा केला. एवढंच नाही, तर अभिनेत्री आलिया भट्ट हिच्यासोबत असलेल्या गर्लफ्रेंडच्या नात्याला रणबीरने पती-पत्नीचं नाव दिलं आणि गेल्या वर्षी आलिया – रणबीर यांच्या आयुष्यात एका गोंडस मुलीचं आगमन झालं. आलियाने सोशल मीडियाच्या माध्यामातून ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. अभिनेत्रीने ६ नोव्हेंबर रोजी मुलीला जन्म दिला. आलिया – रणबीर यांच्या मुलीचं नाव राहा असं आहे.

आलिया – रणबीरला अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट केलं जातं. पण आता एका मिटिंगहून परतत असताना रणबीरला स्पॉट करण्यात आलं. यावेळी फोटोग्राफर्सची नजर रणबीरच्या फोन वॉलपेपरवर गेली. अभिनेत्याच्या वॉलपेपरवर पत्नी आलिया आणि लेक राहा यांचा फोटो नसून वडील ऋषी कपूर यांचा फोटो आहे. सध्या रणबीरच्या फोन वॉलपेपरचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by yogen shah (@yogenshah_s)

रणबीरच्या फोन वॉलपेपरवर ऋषी कपूर यांचा एक खास फोटो आहे. फोटोमध्ये ऋषी कपूर यांच्या हातात एक ग्लास दिसत असून ते प्रचंड आनंदी दिसत आहेत. ऋषी कपूर यांनी २०२० मध्ये अखेरच्या श्वास घेतला. कर्करोगामुळे त्यांचं निधन झालं. त्यांच्या अचानक जाण्यामुळे कपूर कुटुंबासह बॉलिवूडला मोठा धक्का बसला.

रणबीरने दाखवला राहाचा फोटो ६ नोव्हेंबर २०२३ मध्ये आलियाने गोंडस मुलीला जन्म दिला. पण लेकीच्या जन्मनंतर आलिया – रणबीरने लेकीचा चेहरा चाहत्यांना दाखवला नाही. राहाची पहिली झलक पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत. पण आता आलिया-रणबीर यांनी लेकीचा चेहरा फोटोग्राफर्सना दाखवला आहे.

एका कर्यक्रमात रणबीरने त्याच्या मोबाईलमध्ये असलेल्या राहाचा क्यूट फोटो फोटोग्राफर्सना दाखवला आहे. आलिया – रणबीर आणि नीतू कपूर यांनी एका खास कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. ज्यामध्ये कपूर कुटुंबाने फोटोग्राफर्सना देखील आमंत्रण दिलं होतं. यावेळी रणबीरने फोटोग्राफर्सना लेकीचा फोटो दाखवला आणि त्यांच्यासोबत प्रचंड गप्पा देखील मारल्या.

रणबीरने राहाचा फोटो दाखवल्यानंतर नीतू कपूर यांनी फोटोग्राफर्सना फोटो पब्लिक न करण्याची विनंती केली. रणबीर आणि आलिया राहासाठी ‘नो फोटो पॉलिसी’ कायम ठेवणार आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.