TJMM Box Office | रणबीर-श्रद्धाच्या चित्रपटाला मिळणार राणी मुखर्जीकडून झटका; कमाईवर लागणार ब्रेक?

चित्रपटात रणबीर आणि श्रद्धासोबतच डिंपल कपाडिया, बोनी कपूर, अनुभव सिंह बस्सी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. मध्यांतरानंतर चित्रपटातील एंटरटेन्मेंटचा डोस डबल होतो.

TJMM Box Office | रणबीर-श्रद्धाच्या चित्रपटाला मिळणार राणी मुखर्जीकडून झटका; कमाईवर लागणार ब्रेक?
Tu Jhoothi Main Makkaar Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 16, 2023 | 12:38 PM

मुंबई : रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटाच्या रुपात बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीला आणखी एक हिट चित्रपट मिळाला आहे. त्यापूर्वी शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. मात्र त्याआधी आणि त्यानंतर प्रदर्शित झालेले काही चित्रपट फारशी कमाई करू शकले नाहीत. अक्षय कुमार, कार्तिक आर्यन यांचेही चित्रपट फ्लॉप ठरले. सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करणाऱ्या ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटाला अभिनेत्री राणी मुखर्जीकडून धोका आहे. राणीमुळे या चित्रपटाच्या कमाईला ब्रेक लागणार की काय, असा प्रश्न चित्रपट व्यापार विश्लेषकांना पडला आहे.

रणबीर – श्रद्धाच्या ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटाने 80 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. आता आठव्या दिवशीही चित्रपटाची समाधानकारक कमाई झाली. बुधवारी या चित्रपटाने पाच कोटी रुपयांपेक्षा अधिक गल्ला जमवला आहे. वीकेंडलाही कमाईचा आकडा चांगला होता. त्यामुळे लव रंजन दिग्दर्शित हा चित्रपट लवकरच 100 कोटी क्लबमध्ये पोहोचणार असल्याचा अंदाज आहे.

‘तू झूठी मैं मक्कार’ची आतापर्यंतची कमाई

बुधवार- 15.73 कोटी रुपये गुरुवार- 10.34 कोटी रुपये शुक्रवार- 10.52 कोटी रुपये शनिवार- 16.57 कोटी रुपये रविवार 17.08 कोटी रुपये सोमवार 6.05 कोटी रुपये मंगळवार- 6.02 कोटी रुपये बुधवार- 5.60* कोटी रुपये एकूण – 87.91* कोटी रुपये

हे सुद्धा वाचा

हा चित्रपट आता 100 कोटींकडे वाटचाल करत आहे. कमाईचा वेग पाहता दुसऱ्या आठवड्यात 100 कोटी रुपये आरामात पार होतील असं म्हटलं जातंय. या चित्रपटाला प्रेक्षक-समिक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.

राणी मुखर्जीमुळे कमाईवर लागणार ब्रेक?

आतापर्यंत रणबीर आणि श्रद्धाच्या या चित्रपटाच्या कमाईचा वेग ठीकठाक होता. मात्र या आठवड्यात थिएटरमध्ये दोन नवे चित्रपट प्रदर्शित होत आहेत. नंदिता दास दिग्दर्शित ‘ज्विगाटो’ आणि राणी मुखर्जीचा ‘मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे’ हे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यापैकी ‘ज्विगाटो’ चित्रपटात कॉमेडीयन कपिल शर्माची मुख्य भूमिका आहे. तर राणी मुखर्जीचा चित्रपट रणबीर-श्रद्धाच्या चित्रपटाला टक्कर देऊ शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.

बऱ्याच काळानंतर बॉलिवूडमध्ये असा रोमँटिक कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्येही या चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे. जवळपास 200 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट 8 मार्च रोजी देशभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला.

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.