Ranbir Kapoor: रणबीर कपूरने येणाऱ्या बाळासंदर्भात घेतला मोठा निर्णय

आलियाची डिलिव्हरी होताच उचलणार महत्त्वाचं पाऊल

Ranbir Kapoor: रणबीर कपूरने येणाऱ्या बाळासंदर्भात घेतला मोठा निर्णय
Alia Bhatt, Ranbir KapoorImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 09, 2022 | 3:57 PM

मुंबई- अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) लवकरच आई-बाबा होणार आहेत. या दोघांच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. एप्रिल महिन्यात लग्नबंधनात अडकल्यानंतर आलियाने जूनमध्ये गरोदर असल्याचं जाहीर केलं. गरोदरपणातही तिने ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) चित्रपटाचं जोरदार प्रमोशन केलं. इतकंच नव्हे तर एका पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावण्यासाठी ती नुकतीच सिंगापूरलाही गेली होती. आलियाने गरोदरपणातच तिच्या पहिल्यावहिल्या हॉलिवूड चित्रपटाचं शूटिंगदेखील पूर्ण केलं. आता रणबीरने येणाऱ्या बाळासाठी मोठा निर्णय घेतल्याचं समजतंय.

बाळाचा जन्म होईपर्यंत रणबीर कोणताच चित्रपट साईन करणार नाही. आपल्या बाळाची होणारी आई म्हणजेच आलियासोबत जास्तीत जास्त वेळ घालवता यावा, यासाठी त्याने हा निर्णय घेतला आहे. म्हणूनच पिता होईपर्यंत तो कुठल्याही चित्रपटाची ऑफर स्वीकारणार नाही.

हे सुद्धा वाचा

रणबीर कपूरला पॅटर्निटी लीव्हवर (पितृत्व रजा) जाण्याची इच्छा आहे. इतकंच नव्हे तर बाळाच्या जन्मानंतर आलियाने नेहमीप्रमाणे तिचं काम करावं, असा सल्ला त्याने दिला आहे. बाळाची जबाबदारी स्वत: रणबीर घेणार असून आलियाला करिअरमध्ये पुढे जाण्यासही तो प्रोत्साहन देणार आहे.

आलिया भट्टच्या बऱ्याच प्रोजेक्ट्सचं काम रखडलं आहे. ती करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातही झळकणार आहे. त्याशिवाय संजय लीला भन्साळी यांच्या ‘बैजू बावरा’मध्येही ती मुख्य भूमिका साकारणार आहे. या चित्रपटांचं शूटिंग पूर्ण करता यावं यासाठी रणबीरने पॅटर्निटी लीव्हसंदर्भात महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.

14 एप्रिल रोजी रणबीर आणि आलियाने लग्नगाठ बांधली. लग्नाच्या अडीच महिन्यानंतर आलियाने गरोदर असल्याचं जाहीर केलं. या दोघांच्या वयात दहा वर्षांचं अंतर आहे. आलिया 29 वर्षांची असून रणबीर 39 वर्षांचा आहे. रणबीरच्या वयामुळे दोघांनी फॅमिली प्लॅनिंग लवकर केल्याचं म्हटलं जात आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.